सुरेश केसरकर हे “ईगल फाउंडेशनच्या” वतीने राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्काराने सन्मानित
सुरेश केसरकर हे “ईगल फाउंडेशनच्या” वतीने राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्काराने सन्मानित
पत्रकार :- सचिन लोहार
सामाजिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल सुरेश केसरकर यांना ईगल फाउंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्कार – २०२४, आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते तसेच डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे, पणन विभागाचे उपायुक्त सुभाष घुले, समाज कल्याण विभाग पुणे च्या उपायुक्त निशादेवी बंडगर, संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टा, ता. वाळवा येथील अण्णासाहेब डांगे इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात हा प्रदान करण्यात आला.
आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, आस्थापना तसेच – समाजातील वंचित व उपेक्षित घटकांप्रती सातत्याने भरीव कार्य करीत असल्यामुळे सुरेश केसरकर त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.सुरेश केसरकर हे औद्योगिक क्षेत्रात स्वतःची नोकरी सांभाळून, शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा यासाठी, महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच ट्रस्टच्या माध्यमातून तसेच द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्यावतीने अवयवदान व देहदान चळवळ गतिमान होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, त्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, याकरिता सातत्याने जिल्हा, राज्य व देश पातळीवर पाठपुरावा करीत असतात.
सुरेश केसरकर हे कोल्हापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते राज्य व देश पातळीवरील विविध शासकीय कमिटी वरती कार्यरत आहेत.त्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.