अखेर उंब्रजकरांवरील धोका टळला
अखेर उंब्रजकरांवरील धोका टळला
प्रशासनाने धोकादायक झाड चोवीस तासात हटवले
उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात
कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या हद्दीत भारत गॅस एजन्सीलगत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर एक वाळलेले महाकाय झाड धोकादायक अवस्थेत होते. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या उंब्रजकर ज्येष्ठ नागरिकांवर धोक्याची टांगती तलवार कायम होती. एखादी गंभीर दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का?असा संतप्त सवाल उंब्रजकर विचारत होते. त्याबाबतच्या तक्रारी देखील आमच्या प्रतिनिधींकडे उंब्रजकर नागरिकांनी मांडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सत्याचा शिलेदार न्यूजने सदरचे वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सूत्रे हलवून धोकादायक झाड हटवले. याकामी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे,कॉन्स्टेबल प्रफुल्ल पोतेकर,पीडब्ल्यूडीचे शिंदे साहेब, कॉन्ट्रॅक्टर प्रताप कुंभार,सचिन पवार, प्रवीण देशमुख आदींनी विशेष सहकार्य केले.