मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला शेवगा पालेभाजीचे घराघरात अनन्यसाधारण महत्व
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला शेवगा पालेभाजीचे घराघरात अनन्यसाधारण महत्व
अनेक विकारावर शेवग्याची पालेभाजी ठरते उपयुक्त
कुडूत्री(प्रतिनिधी)
सुभाष चौगले
७ जूनला मृग नक्षत्राचे परंपरेने सर्वत्र स्वागत केले जाते.या दिवशी शेवग्याची पाल्याची भाजी केली जाते व आवडीने खाली जाते.ही प्रथा पूर्वीपास चालत आली असून ही भाजी आरोग्याला चांगली असून औषध युक्त आहे. त्यामुळे ही भाजी केवळ मृग नक्षत्रावर न खाता वर्षभर खाली तर मानव जातीला आजारापासून दूर ठेवेल.
आयुर्वेदात या भाजीला खूप महत्त्व असून ही भाजी आरोग्यवर्धक आहे. पावसाळ्याच्या तोंडावर येणारे दूषित पाणी व पाण्यातील बदल यामुळे शरीरात कोणतेही विकार होऊ नये म्हणून ही भाजी मृग नक्षत्रावर आवडीने खाली जाते.पानामध्ये अनेक घटक असून ही भाजी तिनशेच्या वर विकारावर उपयुक्त ठरते.व रामबाण देखील आहे.
या भाजीचे महत्व पहाता मृग नक्षत्रावर घराघरामध्ये शेवग्याच्या पालेभाजीचा आस्वाद घेण्यात आला.कोवळी लुसलुसीत भाजी उपलब्ध करून ती घराघरांमध्ये स्वछ करण्यात महिला अन मुली व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळाले.
शेंगा,पाने,फुले यांचे महत्व
आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगा,पाने,फुले,यांचे औषधयुक्त खुप महत्व आहे.अनेक विकार या भाजीमुळे बरे होतात.सर्व भाजीत शेवग्याची पालेभाजीचे अनन्य साधारण महत्व आहे.