हत्ती ग्रामसाठी सुमारे 50 हेक्टर जागा संरक्षित करूंन नैसर्गिक अधिवास उभारण्याची अत्यंत गरज – समाजमन बहुउद्देशीय संस्थेची मागणी
कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे दोन दशक हत्तींचा वावर, पर्यटनासाठी आता व्हावा हत्तींचा वापर
हत्ती ग्रामसाठी सुमारे 50 हेक्टर जागा संरक्षित करूंन नैसर्गिक अधिवास उभारण्याची अत्यंत गरज – समाजमन बहुउद्देशीय संस्थेची मागणी
कोल्हापूर, दिनांक. 21- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2005 सांली कर्नाटक राज्यातून हत्ती आले आणि ते कायमचे इथेच स्थायिक झाले. त्यांना येथून हुसकावून लावण्यासाठी एलिफंट गो बॅक मोहिमेवर आणि इतर मोहिमेवर गेल्या दोन दशकात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. उपाय योजनेचे अनेक प्रस्ताव धूळखात शासन दरबारी धूळखात पडून आहेत.
आजरा आंबोली मार्गावर चर खोदण्यात आले, फटाके वाजवून हतीना हुसकावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोकणातून किंवा कोल्हापूर जिल्ह्यातून हती काही गेला नाही आणि त्यांची शेपूटही येथेच राहिली इतकेच नाही तर या हतीनी आपली पिलावळ ही वाढवली आणि आपल्या कुटुंबाचा विस्तार केला आहे. मात्र कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुखान जगण्याच्या आपल्या आटाहसापायी सार्वजनिक मालमत्ता पायदळी तुडवण्याची, आक्रमक होऊन काही माणसांवर हल्ला करण्याची या माजलेल्या, मदमस्त, मस्तवाल हत्तींनी आपली परंपरा कायम ठेवली आहे आणि
आता तर वनविभाग किंवा वन्यजीव विभागाच्या हाती आता काहीच राहिलेल नाहीये. अशी परिस्थिती आहे.
हत्तींचा बंदोबस्तचा विषय आता कधीच मागे पडला आहे. खरे तर हत्तींसाठी सुमारे पन्नास हेक्टर जागा संरक्षित करून तिथे त्यांना त्यांच खाद्य उपलब्ध करून तसेच तेथे एखाद्या तलावाची निर्मिती करून त्यांचा नैसर्गिक अधिवास उभारण्याची गरज आहे, अशी मागणी कोल्हापुरातील समाजमन संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे यांनी पत्रकातून केली आहे.
साधारणपणे 2005 सांली कर्नाटकातून हत्ती महाराष्ट्रामध्ये आले. अर्थात त्यांचा वावर पश्चिम घाटातील जैवविविधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आहे. आतापर्यंत हत्तीच्या बंदोबस्तासाठी अक्षरशा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. एलिफंट गो बॅक मोहीम ही मध्यंतरी राबविण्यात आली. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा दरम्यान आजरा- आंबोली भागात मोठे चर खोदून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र वन विभाग आणि वन्यजीव विभागाच्या हाती हत्ती लागलेच नाहीत. हत्तींना बेशुद्ध करून त्यांना पकडण्याचा प्रयत्नही काही वर्षांपूर्वी असफल झाला. फटाके वाजवणे, कूपन घालणे असे प्रकारही निष्प्रभ ठरले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सात हत्तींचा वावर आहे, त्यांचे 3 कळप आहेत. अर्थात गेल्या काही वर्षात हत्तीची पिलावळ वाढली आहे. त्यांनी पश्चिम घाटातील सुजलाम सुफलाम भागात आपल्या कुटुंबाचा विस्तार केला आहे. कोल्हापूर शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हत्तींना खाण्यासाठी मुबलक खाद्य असल्यामुळे आणि पाण्याची ही उपलब्धता असल्यामुळे ते या भागातून किंचितही हलायला तयारच नाहीत, त्यांना कितीही पिटाळून लावण्याचा आणि हुसकावून लावण्याचा हर एक प्रयत्न करूनही ते आपल्या जागेवर ठाण मांडून आहेत.
या पार्श्वभूमीवर या हत्तींना नियंत्रण करण्यासाठी एक पर्याय प्रभावी असू शकतो. तो म्हणजे हत्तींसाठी सुमारे 50 हेक्टर जागा संरक्षित करून त्यांना या जागेतच तलावाची निर्मिती करून आणि मुबलक खाद्य उपलब्ध करून त्यांचा नैसर्गिक अधिवास निर्माण करावा. असे केल्यास हे हत्ती मानवी वस्तीमध्ये खाद्याच्या आणि पाण्याच्या शोधात येण्याची आणि मानवांना, शेतीला, वाहनांना उपद्रव करण्याची शक्यता अगदी नगण्य राहील.
याशिवाय काही वर्षांपूर्वी दोडामार्ग मध्ये दोन हत्तींना पकडून कर्नाटक मध्ये नेण्यात आले होते. त्यांना तेथे माणसाळले गेले. पुढे त्यांना चंद्रपूरमध्ये नेण्यात आले आणि त्यांचा आता पर्यटनासाठी तेथे वापर करण्यात येत आहे. हा प्रयोग इथे करण्याची खरी गरज आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वावर असणाऱ्या या हत्तींना पकडून माणसाळले गेल्यास त्यांचाही आपल्याकडे पर्यटनासाठी वापर करता येऊ शकेल.
वनविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीचे सध्या दोन ते तीन कळप अस्तित्वात आहेत. यातील एक कळप चंदगड पाटणे येथे, दुसरा दोडामार्ग- तिलारी घाटात, आणि तिसरा कळप आजरा आणि आंबोली या भागात आहे. यातील एक कळप
राधानगरी मधील हसणे येथे सध्या आला आहे.
हत्तींपासून होणारा उपद्रव टाळायचा असेल तर हत्ती ग्राम सारख्या प्रकल्पाची उभारणी होणे आवश्यक आहे तसेच त्यांना माणसाळून योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचा पर्यटनासाठी वापर करून घेणे हे पथ्यावर पडणारे ठरेल, असे समाजमन बहुउद्देशीय संस्थेला वाटते.