आत्मनिर्भर अष्टपैलू योद्धा व कायदा क्षेत्रातील तप्त लाव्हा: कायदेतज्ञ ॲड राजीव गांधी
रघुनाथ थोरात
पिढीजात सावकारी व्यवसायाला बगल देत न्याय क्षेत्राची निवड करून आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि वकीली क्षेत्रात अप टू डेट असणारे न्यायालयातील क्रिकेट पीच वर जर समोर अनुभवी भक्कम खेळाडू असेल तर त्याला आऊट न करता रन कसे काढून देता येणार नाही.ही विचारसरणी असलेला अष्टपैलू खेळाडू,न्यायालयात दबदबा आणि दहशत असणारे,युवा वकिलांना सदैव मार्गदर्शनासाठी तत्पर असणारे, अहिंसा परमो धर्म हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणारे,कराड न्यायालयातील नामांकित दबंग वकील,नोटरी भारत सरकार ॲड राजीव गांधी यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.
उंब्रज सारख्या ग्रामीण भागात ॲड राजीव गांधी यांचा जन्म झाला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ॲड राजीव गांधी यांनी आपला पिढीजात सावकारी व्यवसाय करावा अशी कुटुंबीयांची इच्छा होती.वकिली व्यवसाय करण्यास घरातील सदस्यांचा विरोध होता.तरी देखील आव्हाने स्वीकारण्याची सवय असलेल्या ॲड राजीव गांधी यांनी सन २००० साली कायद्याची सनद घेऊन कराड न्यायालयात आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील केस हाताळण्याची हातोटी ठेवत नाही या शब्दाला आपल्या डिक्शनरीतून वगळून कोणत्याही क्षेत्रातील काम आले तरी नाही म्हणायचे नाही. दिवाणी,सहकार, ग्राहक,लेबर,महसूल,फौजदारी या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत उत्कृष्ट कामगिरीने आपल्या पक्षकारांची मने जिंकली. ज्या वेळी पक्षकारांवर काहीतरी बेकायदेशीर बाब घडली त्यावेळी आपल्या संपूर्ण आत्मसात केलेल्या ज्ञानाची बाजू लावुन धरत ध्येयवेड्यापणाने प्रसंगी न्यायालयालाही अंगावर घेत न्याय क्षेत्रातील प्रशासनावरही आपली दहशत बसवली.
न्यायालयातील कोणताही वाद,/दावा,केस असो आयुष्यातील अवघड आणि अडचणीच्या क्षणी ज्यावेळी सख्खे सुध्दा साथ सोडून जातात त्यावेळी आपल्या पक्षकारांसोबत ॲड राजीव गांधींनी खंबीरपणे साथ देत संघर्ष योध्दा बनण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली.जमिनीचा वाद असो किंवा नवरा बायकोची भांडणे, जमिन,घर,जागा विकायची असो वा विकत घ्यायचे असो,अथवा एखाद्या गुन्ह्यामधुन सुटका करायची असो. लग्न लावण्यापासून घटस्फोटापर्यंत या सर्व गोष्टींत मदत करून आपले कर्तव्य बजावत आयुष्यभर जेवढा स्वत:चा विचार करत नाही तेवढा आपल्या पक्षकारांचा विचार करत पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.पक्षकाराला केस जिंकून देऊन King बनवणारा आणि स्वत: kingmaker असलेला श्रीकृष्णासारख्या सारथीची भूमिकाही अनेक वेळा गांधी यांनी बजावली आहे.एकवेळ न्याय देणाऱ्याला Convinced नाही करता आले तर निदान confused करणारा बिरबल म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या टप्प्यात आलं की पध्दतशीरपणे कार्यक्रम करणारा चाणाक्ष व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरला आहे.अहिंसा परमोधर्मा हे ब्रीदवाक्य पुरेपूर सार्थ ठरवत गांधी यांनी आजपर्यंत लाखो प्राण्यांचे कत्तल होण्यापासून प्राण वाचवले आहेत.युक्तिवादावर कायद्याची लढाई स्वतःसाठी नव्हे तर गोप्रेमी पक्षकारांसाठी जिंकणारा कसाईचा कर्दनकाळ म्हणून गोरक्षकांचा अजिंक्य सरसेनापती म्हणून त्यांची सर्व दूर ख्याती आहे.गोशाळांना भरीव देणगी मिळवून देत ॲड राजीव गांधी सामाजिक व धार्मिक बांधिलकी जोपासली आहे.फणसाप्रमाणे वरून काटेरी वाटत असले तरी ॲड राजीव गांधी हे आतून फणसाच्या गोड गाभ्याप्रमाणे असून आपल्या वयोवृद्ध पक्षकारांना त्यांच्या वयोमानाने न्यायालयात कमी खेटे घालण्यासाठी तसेच प्रसंगी त्यांना अति व कठोर शब्दात व्यक्त होत त्यांना कोर्टात जास्त वेळ न थांबवता त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी नेहमी तत्पर असतात.अन्यायाविषयी प्रचंड चीड,केसचा निकाल विरोधात लागला तरी जिंकण्याची आशा न सोडणारा संयमी सरदार म्हणून म्हणून त्यांना संबोधले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या न्याय क्षेत्रातील प्रत्येक अपडेटवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. न्याय निर्णय असो किंवा इतर कायद्यातील बदल यावर नेहमीच त्यांचे बारकाईने लक्ष असते.कायदा क्षेत्रातील ज्ञानाचा खजिना त्यांच्याजवळ असल्यामुळे अनेक तरुण वकिलांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.विविध शंका कुशंकांचे निरसन करण्याबरोबरच तरुण वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. आपल्याला स्वतःला नेहमीच ते एक विद्यार्थी समजतात.कोणताही अहंभाव न बाळगता सीनियर ज्युनियर असा भेदभाव न करता न्याय क्षेत्रातील सर्वांनाच ते नेहमी सौजन्याची वागणूक देण्याच्या त्यांच्या सवयीमुळे अनेक तरुण वकिलांचा ओढ त्यांच्याकडे असतो. न्याय क्षेत्रातील नवीन वकिलांबरोबरच महसूल खात्यातील अधिकारी तसेच राजकारणी व इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.न्यायमंदीरात न्यायासाठी झगडणाऱ्या तेजस्वी सुर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!