क्रीडा

आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्यु कॉलेज शालेय विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड   

: पेठ वडगांव येथील झालेल्या शालेय जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमधील आदर्श गुरुकुल विद्यालयाचा १७ व १९ वर्षाखालील मुलांचे विजयी संघ

 

पेठ वडगाव ता.२७ : येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या १७ व १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.या दोन्ही संघांची पलूस सांगली येथे होणाऱ्या शालेय विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला व १७ वर्षाखालील मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस. घुगरे. संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे ,क्रीडा अधिकारी अरूण पाटील व सहाय्यक विकास दळवी, प्रशालेच प्रशासक एस. जी.जाधव व डे विभागाचे प्रशासक एस .ए. पाटील , ग्रीन व्हॅली पब्लिक मुख्याध्यापक आर .बी . शिवई , ज्युनियर कॉलेजचे प्रशासक एस.एस. चित्ते आदर्श गुरुकुल विद्यालयचे जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर ,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे जिमखाना प्रमुख व प्रशिक्षक एस.एस मदने व व्ही .ए .भातमारे व सर्व क्रीडा शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button