क्रीडा
विश्वराज जगताप यांची राज्यस्तरीय जुदोस्पर्धेसाठी निवड
:विश्वराज जगताप
पेठ वडगांव ता २९: येथील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलमधील इयत्ता १० मध्ये शिकत असणारा विश्वराज जगताप यांची राज्यस्तरीय जुदोस्पर्धेसाठी निवड झाली. महावीर कॉलेज कोल्हापूर येथे पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील ८१ किलो गटात विश्वराज प्रफुल जगताप प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची राज्यस्तरीय जुदोस्पर्धेसाठी निवड झाली.या स्पर्धेसाठी त्याला क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडावळे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस. घुगरे संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक आर .बी.शिवई, प्रशालेच प्रशासक एस. जी .जाधव, एस.ए. पाटील जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर,एस. एस मदने,कुस्ती प्रशिक्षक के.डी.पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.