राज्य सरकारचा मोठा निर्णय :राज्यात देशी गाय आता ‘राज्यमाता गोमाता’ घोषित
सत्याचा शिलेदार नवी मुंबई प्रतिनिधी गणेश सुतार
मुंबई- राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टिने देशी गायींच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
राज्यात देशी गायींच्या संख्येत झपाट्याने घसरण होत आहे. देशी गायी एचएफ गायींच्या तुलनेत कमी दूध देत असल्याने शेतकऱ्यांना चारा-पाण्याचा खर्च परवडत नसल्याने देशी गायींच्या संवर्धनाकडे पशुपालकांचा कल कमी असतो. २०१९ साली झालेल्या २०व्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात देशा गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी आढळून आली आहे. २०१२ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणनेच्या तुलनेत महाराष्ट्रात गायींची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे.
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहाराती स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वाप तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायींचं पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना ‘राज्यमाता गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असं यात म्हटलं आहे.