सांस्कृतिक

सध्या पितृ पंधरवडा चालू आहे.अमावस्या शेवटचा दिवस.

 

सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी पंडित डॉ.  उमेश सुतार

काहीजण या काळात श्राद्ध करतात.काही जण करत नाहीत.अर्थात या विषयी मला काही म्हणायचे नाही.मी फक्त माझे विचार मांडणार आहे.कोणाला पटतील कोणाला नाही.

मुळात श्राद्ध करावे का?असेल तर कसे करावे? तर श्राद्ध जरूर करावे.अगदी पिंडदान करून करावे.ते नाही जमले तर तर्पण करून करावे.पिंड सर्व मृत नातेवाईकांचे नावाने करावे.तर्पण ही सर्व मृत नातेवाईकांना हवे.इतर पद्धती पण आहेत,जसे की ब्राम्हणाला दूध केळे दक्षिणा देणे…(हिरण्य )पण मला हे पटत नाही.नित्य तर्पण ही असते.

मी खूपदा कर्म सिद्धांत चा उल्लेख केला आहे.आपली या जन्मात इतरांशी गाठ होते ती पूर्व कर्मानुसार होते.काही आपले नातेवाईक,काही मित्र,काही अगदी तोंड देखले येतात.काही आपल्याला प्रेम देतात,काही द्वेष करतात.काही फसवतात,काही भरभरून मदत करतात.ते तुम्ही अनेक पूर्व जन्मात त्यांचेशी कसे वागलात यावर अवलंबून असते.पण खरे तर तो पवित्र आत्मा असतो,जो फक्त प्रेम करण्यासाठी आलेला असतो.इतर भावना नंतर आपल्या आणि समोरच्याच्या वागण्याने निर्माण होतात.म्हणून संत पहा,ते तुम्ही त्यांचा द्वेष केलात तरी फक्त प्रेमच देतात.

अशा नातेवाईकांशी (सख्खी, चुलत, आते, मामे, मावस सर्वच)आपण जोडले गेलेलो असतो.एक cod तयार झालेली असते.जेव्हा ती व्यक्ती मृत होते,तेव्हा त्या cod पासून मुक्त होण्यासाठी दहावा असतो.म्हणून एखाद्याच्या लग्नाला तुम्ही गेला नाहीत तरी चालेल,पण दहाव्याला जाऊन तिलांजली आवरजून द्या.

आपण दहावा करतो.तेव्हा कावळा शिवतो आणि आपण म्हणतो,की तो आत्मा मुक्त झाला.पण असे झाले असते तर श्राद्ध कशाला करायचे,आत्मा तर मुक्त झाला.

पण व्यवहारात असे दिसून येत नाही.आपल्याला गुरुजी पितृदोष आहे सांगतात.दोन सख्खे भाऊ,पण आर्थिक परिस्थिती भिन्न असते.अनेक ठिकाणी मुलांची लग्न जमत नाहीत.जमली तर टिकत नाहीत.घरात वाद होतात. मुला मुलांचे पटत नाही. भावा भावात,बहिण भावात,आई वडील मुलात वैर असते.नोकरी लागत नाही.टिकत नाही.पुरेसे इन्कम नसते.घरात अकाली मृत्यू होतो.घरात अपंग किंवा special child जन्माला येते.कशातही यश येत नाही.लॉस होत राहतो.चुकीचे वागण्याची बुध्दी होते.हे सर्व का होते?या मागे असं काय असते?

आता तुम्ही म्हणाल आम्ही श्राद्ध करतो.सर्व पद्धतशीर करतो.मग असे का व्हावे?

एकदा एक लक्षात घ्या.आपले पूर्वज(पूर्वज म्हणजे फक्त आई वडील नाहीत तर सर्वच नातेवाईक) जिवंत असताना आपण त्यांचेशी कसे वागलो होतो?त्यांना दुःख दिले होते का?त्यांना त्रास दिला होता का?त्यांचे जगणे असह्य केले होते का?मग त्यांचे आत्मे तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील का?जरी तुम्ही त्यांचे श्राद्ध केलेत तरी कसे संतुष्ट होतील?…शिवाय आपण हे सर्व आपल्या मुलांना सुख मिळावे म्हणून केलेले असते.मग त्यांचे असंतुष्ट आत्म्याचा शाप,तळतळाट ही आपल्याकडे वारसा हक्काने येतात.तो कसा टाळता येणार?छोटीशी लालुच उपयोगी पडत नाही.आपली कर्मच एवढी मोठी असतात,ती लगेच कशी नष्ट होतील?दगडावर पाण्याची धार(आपल्या कर्माची…) अखंड कित्येक वर्ष पडावी लागते तेव्हाच तो दगड फुटतो. तसच आहे हे.

या साठी आपली या जन्मातील कर्म आत्तापासून सुधारा.अन्यथा कर्म हे अश्वत्थामा च्या जखमे प्रमाणे आपल्या मागे फिरत राहणार हे नक्की आहे.शिवाय ते पुढच्या पिढीला वारसा हक्कानी मिळत राहणार.वडिलोपार्जित संपत्ती जशी मिळते,तशी ही वाईट कर्म,शाप ,तळतळाटही आपल्याला वारसा हक्कानी मिळतात.

आतून काही अंशी (पूर्ण नाही)मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला श्राद्ध ने मिळाला आहे.जीवन सुकर होण्याचा तो अल्प प्रयत्न आहे.तेव्हा ते जरूर करा.करताना आपल्या कुटुंबातील सर्व(चुलत, आते,मामे,मावस)मृत नातेवाईकांचे स्मरण करून तर्पण करा.मृत मित्र,प्राणी,सहकारी यांचे नावानेही करा…

एकदा करून पहा.कदाचित चमत्कार तुमच्या नशिबात असेल…

 

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button