भवानीमातानगरमध्ये पंतप्रधान सौर योजना राबवणार: सरपंच प्रवीण यादव
रघुनाथ थोरात
भवानीमातानगर,ता.कराड ग्रामपंचायत पंतप्रधान सोलर घर योजना राबवणार असल्याची माहिती गावचे सरपंच प्रवीण यादव यांनी दिली. उंब्रज महावितरण अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान सौर घर योजना ही अशी सरकारी योजना आहे की जिचे उद्दिष्ट भारतातल्या प्रत्येक घरात मोफत वीज उपलब्ध करणे हे आहे. या योजनेच्या माध्यमातून घरांच्या छतांवर सौर पॅनल लावण्यासाठी शासनाकडून सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेमुळे पर्यावरणात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे देशातल्या जास्तीत जास्त घरांपर्यंत ही योजना पोचली तर निश्चितपणे देशातील प्रत्येक गाव हे ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनेल. यावेळी उंब्रज महावितरणचे अधिकारी गुरव साहेब, सोलर वर्ल्ड कंपनीचे रविदादा पाटील, सरपंच प्रवीण यादव ,सदस्य-भास्कर सुतार,संभाजी थोरात ,वैशाली यादव ,सुवर्णा पवार,तेजस्विनी पवार,संगीता यादव,महेश यादव,हिम्मतराव यादव,विनोद यादव,बाजीराव थोरात,प्रकाश पवार,पोपट पवार,सतीश यादव,दिलीप यादव,दीपक भोंसले,मुगुट पवार,आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.