आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगांव च्या रोलबॉल संघाची शालेय विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
: पेठ वडगांव येथील सातारा येथे होणाऱ्या शालेय विभागीय रोलबॉल स्पर्धेसाठी आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगांव च्या रोलबॉल संघ
पेठ वडगाव ता. २४ : येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल च्या संघांची सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.पेठ वडगांव येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तर रोलबॉल स्पर्धेमध्ये येथे १४ व १७ वर्षाखालील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चा संघ प्रथम क्रमांक पटकावला तर १९ वर्षाखालील आदर्श गुरुकुल विद्या.व ज्यू. कॉलेज पेठ वडगांव संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून या संघाचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यावेळी क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, व हातकणंगले तालुका समन्वयक संताजी भोसले उपस्थित होते. काय यशस्वी विद्यार्थ्यांना
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ . डी.एस. घुगरे ,संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक आर .बी.शिवई,प्रशालेच प्रशासक एस. जी . जाधव,डे विभागाचे प्रशासक एस.ए. पाटील,जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर,एस. एस मदने, संघ प्रशिक्षक व्ही.ए.भातमारे व सौरभ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.