स्वच्छ पर्यावरण व चांगल्या आरोग्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम ग्रामस्थ व शाळांनी यशस्वी करा.- कुलदिप बोंगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती .
व्हन्नूर (ता.कागल) येथील श्री दौलतराव निकम विद्यालय येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिम
पत्रकार – सुभाष भोसले
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेचा कागल तालुक्याचा शुभारंभ व्हन्नूर (ता.कागल) येथील श्री दौलतराव निकम विद्यालय येथे झाला. त्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
श्री.बोंगे पुढे म्हणाले, लहानपणापासूनच स्वच्छतेचे संस्कार शाळेने द्यावेत, तसेच वडीलधाऱ्या मंडळींचे प्रबोधन ग्रामपंचायत स्तरावर व्हावे यासाठी शासन निश्चित पाठबळ देईल.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ.सारिका कासोटे यांनी कागल तालुक्यातील या मोहिमेत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा आघाडीवर राहून राज्यात आदर्शवत काम करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘एक झाड आईच्या नावे’ याअंतर्गत वृक्षारोपण, महात्मा गांधी व दौलतराव निकम यांच्या प्रतिमेचे पूजन, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते झाले.यावेळी काढण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीत व स्वच्छता मोहिमेत गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, मान्यवर, विद्यार्थी, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. स्वच्छतेबाबत सामूहिक शपथ, स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे, विस्तार अधिकारी अमोल मुंडे, कक्ष अधिकारी अमित माळगे, स्वच्छ भारत मिशनच्या गायत्री सरनाईक, रणजीत जाधव, शुभम देसाई, यशवंतराव निकम, उपसरपंच मंगल कोकणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप लोंढे, डॉ.प्रज्ञा कदम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय दाभाडे, ग्रामसेवक मोरेश्वर जंगम यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले. सूत्रसंचालन मंगल खोत यांनी केले. तर आभार सरपंच पूजा मोरे यांनी मानले.कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदिप बोंगे यांनी केले.