राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आढावा बैठक संपन्न
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आढावा बैठक संपन्न
पत्रकार- सुभाष भोसले
शेगाव कार्यशाळा चर्चा सत्र च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांनी सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. त्यामध्ये जे जे पदाधिकारी संघटनेसाठी काम करणार नसतील त्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच प्रत्येक महिन्यात संघटना तीन आंदोलन, निवेदन व सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवीन पदाधिकारी व संघटना वाढीसाठी काम करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्ता पाटील, कोल्हापूर जिल्हा सचिव सलीम शेख, तालुकाप्रमुख अनिल मगदूम, नानक सिंग, प्रशांत पाटील, तानाजी मोरे, रमेश जैन, जयदीप पाटील, आर आर शिंदे, शिवाजी गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते