डॉ. सुधाकरराव कोरे कामगार सहकारी पतसंस्थेस दोन लाख २६ हजार नफा
नवे पारगाव येथील डॉ. सुधाकरराव कोरे कामगार सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कु. अनुष्का पीएस पाटील हिचा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविल्याबद्दल सावित्रीअक्का शैक्षणिक पुरस्काराने गौरव करताना डॉ. शिल्पाताई कोठावळे, प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी, उपाध्यक्ष सुधीर जाधव, निलेश हुजरे, विनायक माने, सुधीर राऊत व संचालक मंडळ.
नवे पारगाव वार्ताहर
नवे पारगाव ता. हातकणंगले येथील डॉ. सुधाकरराव कोरे महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट कामगार सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली .
अध्यक्षस्थानी अध्यक्षा डॉ. शिल्पाताई कोठावळे होत्या.
स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधीर जाधव यांनी केले. अहवाल वाचन सचिव विद्याधर कांबळे यांनी केले.
संस्थेस दोन लाख 26 हजार 660 रुपये नफा झाला असून पाच टक्के लाभांश व तीन टक्के बक्षीस एकूण आठ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती डॉ. शिल्पाताई कोठावळे यांनी यावेळी दिली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीअक्का कोरे शैक्षणिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला .कु. अनुष्का पीएस पाटील ,वेदांत भिकाजी पाटील ,साक्षी अमोल कांबळे, या सभासदांच्या पाल्यांचा अध्यक्ष डॉ. शिल्पाताई कोठावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त सभासद विमल घोरपडे यांचा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरीष कुलकर्णी ,कार्यालयीन अधीक्षक विनायक माने, महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव निलेश हुजरे ,लेबर ऑफिसर सुधीर राऊत ,सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले तर आभार संचालक अशोक पाटील यांनी मानले.