तावडे हॉटेल चौकतील वाहतुकीला शिस्त लावा :उद्धव ठाकरे शिवसेनेची मागणी
उचगाव : तावडे हॉटेल चौकातील वाहतुकीला शिस्त लावा, या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना देताना शिवसैनिक.
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
तावडे हॉटेल चौकामध्ये सतत होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत त्वरीत उपाययोजना करून वाहतुकीला शिस्त लावण्यात यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वाहनधारक पुणे-मुंबईसह हायवेवरून कोल्हापूरमध्ये तावडे हॉटेल मार्गे शहरात प्रवेश करत असतात. तावडे हॉटेल चौकामध्ये शहर विभागातील वाहतुक पोलिस नसल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते. याचा परिणाम हायवेवर तसेच कोल्हापूर शहर स्वागत कमान या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठया रांगा लागतात. गांधीनगरच्या बाजूला गांधीनगरचे वाहतूक पोलिस असतात. पण या चौकामध्ये तावडे हॉटेलच्या शहराकडील बाजूस वाहतुक पोलिस नसल्याने वाहतुकी च्या कोंडीत वाढ होत आहे. गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना सतत अडथळा होत आहे. उचगांवच्या शेतकऱ्यांनाही निगडेवाडी, पंचगंगा नदी परिसरातील असणाऱ्य शेतामध्ये येजा करताना मनस्ताप होत आहे. दसरा व दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांची येण्याची संख्या मोठी असते. गांधीनगर बाजार पेठेत कर्नाटक व राज्यभरा तून ग्राहक व व्यापारी खरेदीसाठी येत असतात. याकरिता या चौकामध्ये शहर वाहतूक शाखेचे किमान दोन ते तीन पोलीस कर्मचारी तैनात करावेत. याबाबत योग्य उपाययोजना केली नाही तर तावडे हॉटेल परिसरात करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. याबाबतचे निवेदन शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना तावडे हॉटेल चौकात देण्यात आले. यावेळी
दिपक रेडेकर, शरद माळी, राजेंद्र पाटील, बाळासाहेब नलवडे, आबा जाधव, राकेश फराकटे, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे आदींनी तनपुरे यांच्याशी चर्चा केली.