माथेरान अश्वशर्यती पाहण्यासाठी आदिवासी प्रेक्षकांची गर्दी अलोट
माथेरान अश्वशर्यती पाहण्यासाठी आदिवासी प्रेक्षकांची गर्दी अलोट
सत्याचा शिलेदार वार्तापत्र प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड माथेरान..
भारतातील प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यातील थंड हवेचे ठिकाण माथेरान कोणत्याही प्रकारचे चार चाकी वाहन नाही येथील दळणवळण हे माथेरानचे आकर्षण असणारे घोडे आणि येथील अश्वचालक माथेरानला पिकनिक साठी येणारे पर्यटक घोड्यावर साईट सीन पाहण्यासाठी आनंदाने घोडेस्वारी करीत असतात. आणि जगभरात होणाऱ्या अश्व शर्यती आणि त्या शर्यतीत नावलौकिक करणारे माथेरानचे घोडे व घोडेस्वारी जॉकी प्रामुख्याने जगभरात नावलौकिक करीत आहे.
म्हणून माथेरान येथे अश्व शर्यती गेली अनेक वर्षापासून प्रदीप दिवाळकर .संदीप शिंदे .अनिश शेख. अकबर मुजावर .व माथेरान शहरातील अश्वप्रेमी मे महिन्यातील शेवटच्या सप्ताहात माथेरानला घोड्यांच्या रेस स्पोर्ट्स असतात आणि अश्व शर्यती पाहण्यासाठी पर्यटकांसह रायगड जिल्ह्यातील आदिवासी कड्या कपारीत राहणाऱ्या वाडीतील आदिवासी पालघर ठाणे अलिबाग व अनेक जिल्ह्यातून माथेरानला अश्व शर्यती पाहण्यासाठी अलोट गर्दी करताना दिसत आहेत. आम्ही काही आदिवासी बांधवांबरोबर माथेरानला येण्याचे कारण विचारले असता एक दिवसाची अश्वशर्यत पाहण्याचा आनंद व पिकनिक करण्यासाठी माथेरानला वर्षातून एकदा भेट देतो. व माथेरानच्या पिकनिकचा आनंद घेतो. असे वक्तव्य केले….