Blog
सांत्वन करताना आ. सतेज पाटील यांच्या डोळ्यांंतुन अश्रू अनावर
सांत्वन करताना आ. सतेज पाटील यांच्या डोळ्यांंतुन अश्रू अनावर
कोल्हापूर,आमदार पी एन पाटील हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याची माहिती मिळताच तातडीनं परदेशातून परतीच्या प्रवासाला निघालेले आ. सतेज उर्फ बंटी पाटील ३० तासांचा सलग प्रवास करून आज कोल्हापूरात पोहोचले. आज पहाटे ३ वाजता मुंबईमध्ये पोहोचताच ते लगेच कोल्हापूरला यायला निघाले आणि थेट सडोली खालसा येथे पी एन पाटील यांच्या रक्षा विसर्जनासाठी उपस्थित राहिले. यावेळी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांना आलिंगन देऊन सांत्वन करताना आ. सतेज पाटील यांच्या डोळ्यांंत अश्रू अनावर झाले.