महाराष्ट्रशेत-शिवार

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचं पाऊल, खुल्या बाजारात गहू आणि तांदळाची विक्री

FCI : भारतीय अन्न महामंडळाकडून ( Food Corporation of India )  खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत 10,22,907 मेट्रिक टन  गहू आणि 2975 मेट्रिक टन तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. 94,920 मेट्रिक टन ‘भारत आटा’ चा गहू आणि 13,548 मेट्रिक टन ‘भारत चावल’ ब्रँडचा तांदूळ निमशासकीय आणि सहकारी संस्थांना वितरित करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळानं गहू आणि तांदूळ बाजारात आणल्याने गहू आणि तांदळाच्या किमतींत घसरण झाली आहे.  

आजपर्यंत गव्हाचे 34 तर तांदळाचे 31 लिलाव झाले

गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठयातून 50 लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या किंवा गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत)  अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड 300 (मेट्रिक टन) च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार  अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीला मान्यता दिली आहे. आजपर्यंत गव्हाचे 34 तर तांदळाचे 31 लिलाव झाले आहेत. या लिलावात 16,16,210 मेट्रिक टन गहू आणि 14,07,914 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. रास्त सामान्य गुणवत्तेच्या गव्हासाठी रुपये 2150/क्विंटल आणि शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत  असलेल्या  गव्हासाठी रुपये 2125/क्विंटल आणि फोर्टिफाइड तांदळासाठी रुपये 2973/क्विंटल आणि एफएक्यू तांदूळासाठी रुपये 2900/क्विंटल राखीव किमतीवर गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 12,07,655 मेट्रिक टन गहू आणि 3877 मेट्रिक टन तांदूळ हे स्वीकारलेले प्रमाण आहे.  

विक्री करण्यात येणाऱ्या गहू आणि तांदळाची किंमत काय?

केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित (एमएससीएमएफएल) यांसारख्या निम-सरकारी आणि सहकारी संस्थांना ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गहू आणि तांदळचे अतिरिक्त वाटप केले आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत या संस्थांना 94,920 मेट्रिक टन गहू आणि 13,548 मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 54,343 मेट्रिक टन गहू आणि 200 मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे. या संस्थांना गहू 1715 रुपये क्विंटल आणि तांदूळ 18.59 रुपये किलो दराने दिला जात आहे. या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना 5 किलो, 10 किलो पॅकेजमध्ये 27.50 किलो (आटा) आणि 29 किलो (तांदूळ) दराने  विक्री करतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button