राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल च्या खेळाडूंचे घवघवीत यश
राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल च्या खेळाडूंचे घवघवीत यश
स्पेन युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
पेठ वडगांव ता.१:येथील राष्ट्रीय असोसिएशन किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल च्या खेळाडूंचे घवघवीत यश संपादन केले आहे. दिनांक २६ ते ३० सप्टेंबर रोजी डेहराडून,उत्तराखंड येथे पार पडलेल्या असो राष्ट्रीयस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपाद केले आहे.यामधील सुवर्णपदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची स्पेन युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तसेच महाराष्ट्र संघाला सब-ज्युनियर चॅम्पियनशिप उपविजेता ठरला आहे. सुवर्णपदक प्राप्त केलेले खेळाडू प्रेम वाघमारे ९ वी सेमी,प्रतीक गायकवाड १० वी सेमी, रोप्य पदक प्राप्त केलेले खेळाडू सर्वेश पाटील ९ वी इंग्लिश कांस्यपदक प्राप्त केलेले खेळाडू रितेश पाटील १० वी इंग्लिश,आर्यन कचरे १० वी सेमी,अंशुमन जाधव १० वी सेमी, पारस चव्हाण ९ वी इंग्लिश या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.
या यशस्वी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस. घुगरे, संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक आर .बी.शिवई, प्रशालेच प्रशासक एस. जी . जाधव,डे विभागाचे प्रशासक एस.ए. पाटील,जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर,एस. एस मदने,किक बॉक्सिंग प्रशिक्षकअक्षय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.