आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव च्या खेळाडूंची शालेय जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश
आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव च्या खेळाडूंची शालेय जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश केलेला संघ व खेळाडू प्रशिक्षक
रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
पेठ वडगांव ता१:येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव च्या खेळाडूंची शालेय जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.दि. 24/09/2024 रोजी के.एम.सी कॉलेज कोल्हापूर येथे पार पडलेल्या १७ वर्षा खालीलशालेय जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. यांची रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. खेळ व खेळ प्रकारात यश संपादन केलेले विद्यार्थी अनुक्रमे पुढील प्रमाणे सेबर प्रकार पियूष पवार,यशराज भोसले,अथर्व नलवडे .फॉइल प्रकार अभिनव मोहिते. ईपी प्रकार निखिल वडगावे,पियूष पवार, मुली मध्ये फॉइल प्रकार ताजिन बारगीर.सेबर प्रकार वैष्णवी मोरे,असिन बारगीर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यासाठी त्यांना
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.एस. घुगरे,संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक आर .बी.शिवई,प्रशालेच प्रशासक एस. जी . जाधव,डे विभागाचे प्रशासक एस.ए. पाटील,जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर,एस. एस मदने,प्रशिक्षक स्नेहल कुंभार
यांचे मार्गदर्शन लाभले.