ममता बॅनर्जींचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ व्हायरल राजकारणाला क्षणभर ‘विश्रांती’!
ममता बॅनर्जी यांनी रविवारी (दि.७) ट्रेडमिलवर चालतानाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला . या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिली आहे की, “काही दिवस तुम्हाला काही अतिरिक्त प्रेरणा आवश्यक आहे!” आणि कुत्र्याच्या पिल्लाची इमोजी दिली आहे. या व्हिडिओला ३१,००० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पांढरी साडी परिधान केली आहे. आणि कुत्र्याच्या पिल्लाकडे पाहत-पाहत ट्रेडमिलवर चालत आहेत.
केंद्रीय राजकारणात सध्या भाजप विराेधी पक्ष एकजूट करत आहेत. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नावे आघाडीवर आहेत. आक्रमक विराेधी पक्ष नेत्या अशी ओळख असणार्या ममता बॅनर्जी यांच्या वर्कआउट करतानाचा व्हिडिओ तृणमूल काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते यांना प्रेरणा देणारा ठरल्याची चर्चा आहे.