अपराजित नेता खासदार धैर्यशील माने
विजयानंतर खासदार धैर्यशील माने यांचे औक्षण करण्यात आले
विजयानंतर आजोबा कै.बाळासाहेब माने व वडील कै.संभाजीराव माने यांच्या प्रतिमेस वंदन करताना खासदार धैर्यशील माने
रूकडी ता.५ : अपराजित म्हणण्याचा हेतू असा की ते २००२ रुकडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.२००९ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य २०१२ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्ष पद भूषवले.त्यानंतर २०१९ व आता २०२४ या दोन वेळा खासदार बनले.आत्तापर्यंत ते एकही निवडणूक पराभूत झाले नाहीत म्हणून खासदार धैर्यशील माने अपराजित नेता म्हणावे लागेल.
निरंतर संघर्ष में ,मैं फिसलता हूँ, गिरता हूँ, फिर संभलता हूँ,उठता हूँ, फिर चलता हूँ, लेकिन मैं कभी हार नहीं मानता. क्योंकि मैं अपराजित हूँ!
वरील कवितेप्रमाणेच आपल्या राजकीय संघर्षातून आपले अस्तित्व आबादीत राखून सातत्यपूर्ण अपराजित असलेला नेता म्हणून खासदार धैर्यशील माने यांची ओळख सांगता येईल. होय राजकीय संघर्ष म्हणावा लागेल कारण लोकनेते खासदार कै.बाळासाहेब माने यांच्यापासून माजी खासदार निवेदिता माने ते स्वतःखासदार धैर्यशील माने या तीन पिढ्या जरी खासदारकी यांच्याकडे असली तरी आपले आजोबा कै.बाळासाहेब माने यांच्याकडून तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमी कार्यरत राहण्याची शिकवण त्यांच्या पुढच्या पिढीने वाटचाल केली आहे असे दिसते.जरी आठ वेळा खासदारकी या घरात असली तरी त्यांनी कधी मोठे उद्योग,एकदा कारखाना,एखादी इंडस्ट्री उभी केली नाही.आपलं घर पैशाने भरले नाही.म्हणूनच काय त्यांना इतकं राजकीय संघर्ष करावा लागतो.
संघर्षमय राजकीय प्रवास
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, शिवसेना शिवसेना(शिंदे गट)असे माने घराण्याकडून वारंवार पक्षांतर झाले.असले तरी सामान्य जनतेशी जोडलेले नाळ व निष्ठावंत कार्यकर्ते याच्या बळावर ते आपले राजकीय वर्चस्व टिकवून आहेत.या मतदारसंघात कै.बाळासाहेब माने यांनी निष्ठेने कार्य करून काँग्रेस बळकट केली.त्यांनी समोर तगडे आव्हान असून सुद्धा सलग पाच वेळा खासदार बनून मतदारसंघाचे नेतृत्व केले.१९९४ मध्ये बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर माने घरावर व गटावर संकट आले होते.या आधी १९८४ मध्ये निवेदिता माने यांचे पती संभाजीराव माने यांचे अपघाती निधन झाले होते. बाळासाहेब माने यांच्या सुनबाई निवेदिता संभाजीराव माने यांना काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारी नाकारण्यात आली होती.या संकटात निवेदिता माने डगमगल्या नाहीत.उलट धाडसणे राजकीय प्रवास सुरू केला. दरम्यान त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.यावेळी रत्नाप्पा कुंभार,सा.रे पाटील,जयंतराव आवळे यांच्या पाठबळावर त्यांनी कडवी झुंज दिली.पराभव पत्करून देखील दोन लाखांहून अधिक मते मिळवली होती.१९९६ मध्ये मध्यवर्ती निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे सांगितले यावेळी देखील त्यांचा निसटता पराभव झाला.
दरम्यान कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षातून निवेदिता माने यांनी १९९९ मध्ये इचलकरंजीतून १३ व्या लोकसभेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार कल्लाप्पा आवाडे पराभव केला.२००४ मध्ये १४ व्या लोकसभेत शिवसेनेचे डॉ.संजय पाटील यांचा पराभव करून त्या खासदार झाल्या.परंतु २००९ मध्ये पंधराव्या लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून निवेदिता माने यांचा पराभव झाला. त्यानंतर बदलती राजकीय परिस्थिती व पक्षातील राजकारण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवेदिता माने यांना डावलण्यात आले.आपले राजकीय अस्तित्व व चिरंजीव धैर्यशील माने यांना राजकीय भविष्यासाठी निवेदिता माने यांची धडपड चालू झाली होती.
दरम्यान या विविध घटनेचा प्रभाव धैर्यशील माने यांच्या जीवनावर राजकीय वाटचालीवर झालेला दिसत होता.आपल्याला आधार देणारे वडील व आजोबा यांच्या निधनाने धैर्यशील माने यांचा जीवनामध्ये न भरणारी पोकळी निर्माण झाली होती.परंतु ते हतबल न होता. आई निवेदिता माने यांनी दिलेले संस्कार व कै. बाळासाहेब माने यांच्यापासून मिळालेले राजकीय बाळकडू च्या जोरावर त्यांनी आपली राजकीय वाटचाल चालू ठेवली होती.धैर्यशील माने २००२ मध्ये ग्रामपंचायत सदस्य २००९ ते २०१२ मध्ये जिल्हा परिषदेत सदस्य ते उपाध्यक्ष असा राजकीय प्रवास चालू होता.२०१८ मध्ये धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून पंचगंगा प्रदूषणासारखा ज्वलंत प्रश्न घेऊन प्रभावी वक्तृत्व,तरुण व तडफदार नेतृत्व अशी राजकीय ओळख निर्माण करत नवीन राजकीय प्रवास सुरू केला.या प्रवासात त्यांना यश आले २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभूत करून धैर्यशील माने खासदार झाले.आता त्यांना राजकीय स्थिरता लाभले असे वाटले होते.परंतु यानंतर २१ जून २०२२ रोजी महाराष्ट्रात घडलेल्या शिवसेना पक्ष फुटीच्या राजकीय घडामोडीनंतर धैर्यशील माने यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला.त्यांनी मतदारसंघातील कामे करण्यासाठी व केंद्रीय नेतृत्वाला पसंती लक्षात घेऊन शिंदे गटात प्रवेश केला.आत्ताच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत सुरुवातीला राजकीय प्रचार विरोधात गेलेले उमेदवारी नाकारण्याची नकारात्मक परिस्थिती असताना देखील सकारात्मक विचार घेऊन उमेदवारी मिळवली आणि आपण केलेल्या विकासकामे व राजकीय समीकरणे जुळवली.नाराज असलेल्या मित्र पक्षातील नेत्यांना व सहकारी नेत्यांना सोबत घेऊन अगदी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा सपाटा उडवला. भाजप नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री व आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक अशा दिग्गज नेत्यांचे समीकरण घालून प्रचारात आघाडी मिळवली. आणि या २०२४ अंतर्गत हातकणंगले मधून शिवसेना (शिंदे गट)धैर्यशील माने यांना एकूण ५२०१९० मत तर प्रतिस्पर्धी सत्यजित बाबासाहेब पाटील-सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)५०६७६४ व राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (स्वाभिमानी पक्ष)१७९८५० मते मिळालीत.धैर्यशील माने १३ हजार ४२६ मतांनी विजयी झाले.ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.
लेखन संकलन : प्रशांत भोसले
विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष