तालुका हातकणंगले वार्तासंपादकीय

हातकलंगले विधानसभेत तिरंगी लढत : सुज्ञ मतदारच देईल विजयाचा कौल

हातकलंगले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी राजू बाबा आवळे,महायुतीकडून अशोकराव माने,परिवर्तन महाशक्तीचे डॉ. सुजित मिणचेकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होत असली तरी सुज्ञ मतदारच विजयाचा कौल देईल. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे.महाराष्ट्र राज्यात विधानसभा मतदारसंघात २८८ मतदार संघ आहेत.त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले विधानसभा (क्र.२७८) मतदारसंघ एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे.२०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचे राजू बाबा जयवंतराव आवळे, तर २०१४ व २००९ शिवसेना पक्षाचे डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर यांनी विजय प्राप्त केला होता. यंदा हातकणंगले मतदारसंघात जरी सोळा उमेदवार रिंगणामध्ये असतील तरी महाविकास आघाडी चे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार राजू जयवंतराव आवळे महायुतीकडून जन सुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कडून डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात तिरंगी लढत आहे.ही जरी तिरंगी लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडी कडून डॉक्टर क्रांती वसंत सावंत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ )गणेश विलास वायकर, अशोक तुकाराम माने,वैभव कांबळे, अजित देवमोरे असे इतर तेरा प्रमुख उमेदवार रिंगणात असल्याने या उमेदवारांच्या मत विभागणीवरून देखील विजय ठरणार आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू (बाबा) जयवंतराव आवळे यांनी जवळपास ७३ हजार मते मिळवत विजय संपादन केला होता तर शिवसेनेपेक्षा कडून लढत असणारे डॉ. सुजित मिणचेकर ६७ हजार मते पडली केवळ ६ हजार मतांनी ते दुसऱ्या क्रमांकावर होते.४४ हजार ५६२ मते मिळवत जन सुराज्य पक्षाचे अशोकराव माने तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर २०१४ मध्ये ८९ हजार मते २००९ मध्ये ५५ हजार ५८३ मते प्राप्त करत डॉ.सुजित मिणचेकर करत दोन वेळा विजय संपादन केला होता.तर २००९,२०१४,२०१९ यामध्ये इतर प्रमुख राजकीय पक्षांनी व अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्या टक्क्यांमध्ये १५ ते १८ टक्क्यापर्यंत वाढ होताना दिसत आहे.

 

प्रमुख नेते यांचे प्राबल्य

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सादर एकूण मतदान ३४१६८५ आहे.जवळपास ५८ ते ६० गावे ,वाडी वस्ती आहेत यामध्ये ३३१ पुलिंग बुथ आहेत. तर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस सतेज पाटील,जयवंतराव आवळे,जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनयरावजी कोरे,शिवसेना खासदार धैर्यशील माने,भाजप प्रकाश आवाडे,महाडिक गट,शेतकरी संघटना राजू शेट्टी,वंचित बहुजन समाज गट अशा विविध गट व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते यांचे प्राबल्य आहे.

 

 

याचा परिणाम मतामध्ये दिसणार ?

 महाराष्ट्राच्या अस्मिता मलीन करणाऱ्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मतामध्ये दिसणार ? मागील २०१९ निवडणुकीत झालेल्या राजकीय अस्थिरता व सत्ता संघर्षामुळे झालेल्या कुटील राजकारणाचा परिणाम मतामध्ये दिसणार ? राजकीय दगा फटका यामुळे पक्ष सांभाळणारे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती लोक मताची ताकद त्यांच्यासोबत असणार ? ईडी व राज्यपाल व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गैरवापर व यांची कार्यप्रणाली याचा परिणाम मतामध्ये दिसणार का ? तसेच बटेंगे तो कटिंग, एक है तो सेफ है याचा परिणाम मतामध्ये दिसणार ? संविधान बचाव याचा परिणाम मतामध्ये दिसणार ? गद्दारांना गाडा याचा परिणाम मतामध्ये दिसणार ? करेक्ट कार्यक्रम याचा परिणाम मतामध्ये दिसणार का ? केलंय काम भारी..आता पुढची तयारी..याचा परिणाम मतामध्ये दिसणार का ? मराठा आंदोलनाचा गनिमी कवा याचा परिणाम मतामध्ये दिसणार का ? लाडकी बहीण योजना महिला कल्याण की मत विभागणी ? लाडकी बहिणी योजनेवरून भाजप नेत्यांनी केलेले विधान याचा परिणाम मतामध्ये दिसणार का ? तर पंचगंगा प्रदूषण मुक्ती, औद्योगिक क्षेत्राचा विकास,आरोग्य सुविधांचा अभाव,रस्ते व पाणीपुरवठा,युवकांना रोजगाराच्या संधी, पशु व दुग्धोत्पादन,शेतमाल व शेतीपूरक मालाला हमीभाव,शिक्षण कला क्रीडा सांस्कृतिक वैज्ञानिक अशा क्षेत्रात हातकणंगले तालुक्यामध्ये प्रबळ व प्रतिभावंत विद्यार्थी व खेळाडू असून सुद्धा त्यांना योग्य संधी कधी भेटणार ? तसेच स्थानिक विविध प्रश्न बाजूला ठेवून मिळाल्या नोटांसाठी मत विकणार ? काय या विधानसभेतील स्थानिक प्रश्नांची व परिस्थितीची जाणीव असणारा सुज्ञ मतदार विजयाचा कौल देईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button