आरोग्य व शिक्षण

आर्यन, नीलकृष्ण, दक्षेशला १०० पर्सेंटाइल; जेईई मेन्सचा निकाल जाहीर

मुंबई – नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) आयआयटीसारख्या केंद्रीय शिक्षण संस्थामधील प्रवेशासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल जाहीर करण्यात आला आहे. आर्यन प्रकाश, दक्षेश मिश्रा (मुंबई) नीलकृष्ण गजरे (वाशीम), या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. देशभरात १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या २३ विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. या बहुतांश विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे. 

एनटीएने jeemain.nta.ac.in वर जेईई मुख्य निकाल, २०२४ डाउनलोड करण्यासाठी लिंक अपडेट केली आहे. गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जेईई मुख्य निकालाचे लॉगिन तपशील द्यावे लागतील. तसेच पेपर १ची उत्तरतालिका वेबसाइटवर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

शेतकऱ्याच्या मुलाचे यश
वाशिमच्या नीलकृष्ण गजरे याचे वडील शेतकरी आहेत.  जेईईसारखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय मी परीक्षेचा अनेकदा सराव केला, असे नीलकृष्ण याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button