देश-विदेश

अर्थसंकल्पानंतर या दोन कंपन्यांचा शेअर तेजीत, असे आले धूमशान

र्थसंकल्प सादर केला. गुरुवारी शेअर बाजाराने या बजेटवर नाक मुरडले. शेअर बाजारात कमाल झाली नाही. पण या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शेअर मार्केटने बजेटचे स्वागत केलेले दिसते. शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली.
यामध्ये हाऊसिंग अँड अर्बन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (HUDCO) शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. गुरुवारी, बजेटच्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी दिसली. HUDCO च्या शेअरच्या किंमतीत 9.70 टक्क्यांची तेजी दिसून आली. म्हणजे दोन दिवसांत या शेअरने गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.सरकारी कंपनीमुळे मालामाल गुंतवणूकदारहुडकोच नाही तर NBCC च्या शेअरने पण कमाल दाखवली. या शेअरमध्ये 16 टक्क्यांची तेजी दिसली. यानंतर सरकारी कंपनीचा शेअर 167.80 रुपयांच्या स्तरावर पोहचला. ही कंपनी व्यावसायिक, संस्था आणि रहिवाशी इमारती तयार करण्याचे काम करते. कंपनीने एका वर्षात 300 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

आज पण शेअरमध्ये तेजी

शुक्रवारी बीएसईमध्ये हुडकोचा शेअर 219.05 रुपयांवर उघडला. पण थोड्याच वेळात कंपनीचा शेअर 9.70 टक्क्यांच्या उसळीसह 226.95 टक्क्यांच्या स्तरावर पोहचला. यापूर्वी गुरुवारी कंपनीचा शेअर, बाजार बंद होताना 206.35 रुपयांवर होता. या शेअरने दोनच दिवसांत मोठा पल्ला गाठला. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला.

बजेटमध्ये काय झाली घोषणा

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट भाषणात ग्रामीण आणि शहरी भागात घरे बांधण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्यानुसार, देशात दोन कोटी घर बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. इतकेच नाही तर मध्यमवर्गासाठी पण लवकरच एक योजना लागू होणार असल्याचे बजेटमधून स्पष्ट झाले. त्यामुळे लाखो लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. या योजनेत सबसिडीवर कर्ज देण्यात येईल.
  • गेल्या एका वर्षात HUDCO च्या शेअरच्या किंमतीत 360 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर या दरम्यान निफ्टी 50 मध्ये 24 टक्क्यांची तेजी दिसली. केवळ एका महिन्यात HUDCO च्या शेअरचा भाव 68 टक्क्यांनी वधारला आहे.

सूचना :हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button