पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी
नऊ कोटी तीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार
पी एम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याचे अधिकृत प्रकाशन करणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी करताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
शेतकरी कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून सरकार आगामी काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये आणखीन महत्वपूर्ण काम करणार आहे.
नरेंद्र मोदी
दिल्ली ता.१० : भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर लगेच पहिल्याच दिवशी कामाचे सुरुवात केली आहे. यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून सरकार आगामी काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये आणखीन महत्वपूर्ण काम करणार आहे. श्री नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पी एम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याचे अधिकृत प्रकाशन करणाऱ्या फाईलवर त्यांनी स्वाक्षरी केली. यामुळे सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या वितरण होऊन नऊ कोटी तीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 2019 मध्ये देशातील सर्व जमीनधारकांना शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देण्याच्या उद्देशाने पी एम किसान योजना सुरू करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला सहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ दिला जातो केंद्र सरकारच्या 100% अर्थसहाय्यतेने केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून ही योजना राबवली जाते. दोन हजार रुपयाचे तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट लाभधारकांच्या खात्यात वर्ग केले जात आहे या योजनेचा अकरा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा झाला आहे आणि आत्तापर्यंत तीन कोटी होऊन अधिक रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत अशी माहिती सांगण्यात आली आहे.