श्री हनुमान दूध संस्थेस १० लाख ५० हजार नफा : माणिक घाटगे
: निलेवाडी (ता.हातकणंगले ) येथील हनुमान दूध संस्थेतील क्रमांक प्राप्त उत्पादकांना पारितोषिक वितरण करताना चेअरमन माणिक घाटगे सुभाष भापकर शहाजी बोरगे राजाराम मोहिते संजय भापकर दिनकर शेळके दिलीप मोहिते अनिल मोहिते मनोहर शेळके राहुल शेळके इ
नवे पारगाव: निलेवाडी (ता.हातकणंगले ) येथील हनुमान दूध उत्पादक संस्थेस १० लाख ५० हजार नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माणिक घाटगे यानी ५९ व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून दिली.
माणिक घाटगे म्हणाले, हनुमान दूध सहकारी संस्था दूध उत्पादनातील एका अग्रगण्य संस्था असून सभासदांच्या विश्वासावर संस्था टिकून आहे सभासदांनी संस्थेवर टाकलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही संस्थेला एकूण दहा लाख पन्नास हजाराचा नफा झाला असून हे फक्त सभासदांच्यामुळे शक्य झाले जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा त्यावेळी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला . तसेच उत्पादकांना ६% लाभांश देणार असल्याचे चेअरमन माणिक घाटगे यांनी सांगितले यावेळी गाय दूध मध्ये प्रथम क्रमांक -प्रल्हाद सदाशिव माळी द्वितीय क्रमांक-सरदार वसंत शिंदे तृतीय क्रमांक -दीपक बळवंत खोत उत्तेजनार्थ राजाक्का सर्जेराव खोत म्हैस दूध प्रथम क्रमांक- दिलीप वसंत मोहिते द्वितीय क्रमांक ,-सुभाष केशव मोहिते तृतीय क्रमांक संजय निवृत्ती घाटगे उत्तेजनार्थ- शिवाजी बंडू मोहिते या सर्वांचा सत्कार करण्यात आला
संचालक सुभाष भापकर, सचिव राहुल शेळके , यांची भाषणे झाली. यावेळी चेअरमन माणिक घाटगे व्हा चेअरमन दिनकर शेळके संचालक सुभाष भपकर राजाराम मोहिते , शहाजी खोत, प्रभाकर घाटगे अनिल मोहिते, आप्पासो मोहिते, संजय भापकर , वत्सला शेळके , सारिका माने , उपस्थित होते.
प्रल्हाद सदाशिव माळी यांना १४ लाख रुपये किमतीचा गाय दूध पुरवठा संस्थेस केला त्यांचा गाय दूध उत्पादनात प्रथम क्रमांक आला शेती बरोबर दूध उत्पादनात सुद्धा आपलं करियर करता येतं अस माळी यांच्या प्रयत्नामळे सिद्ध झालं युवकांनी नोकरीच्या मागे न लागता दूध उत्पादनात लक्ष दिले तर नोकरी एवढाच फायदा मिळू शकतो असं माळी यांनी सांगितले