घरकुल गृहप्रवेशासाठी खासदार धैर्यशील माने दुरडी घेऊन लाभार्थीच्या घरी
:साजणी येथे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या गृहप्रवेश प्रसंगी खासदार धैर्यशील माने सरपंच शिवाजी पाटील व इतर मान्यवर
साजणी ता.१६: साजणी( ता. हातकलंगले) येथे प्रधानमंत्री आवास योजना मधील पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश समारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी लाभार्थ्याकडे घरकुलाचे चाव्या व प्रमाणपत्र खासदार धैर्यशील माने यांनी सुपूर्त केली. तर खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः च्या खांद्यावर आहेर व गारव्याची दुरडी घेऊन गेले.हा प्रसंग पहाताना चक्क खासदार आपल्या घरकुलाचे गृहप्रवेश साठी आलेले पाहून त्या गरीब लाभार्थी जोडप्यांनां आनंदाश्रू अनावर झाले.पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक एक मधील बंडू महादेव यादव (सर्वसाधारण) व श्रीमती शशिकला विजय कांबळे (अनुसूचित जाती )यांच्या पूर्ण झालेल्या घरकुलांचा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूकीने खासदार धैर्यशील माने यांनी स्वता खांद्यावर गारव्याची शिदोरी घेऊन लाभार्थी कुटुंबांना दिली तसेच चावी व प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.छोटेखानी घरकुलात खासदार धैर्यशील माने येऊन गृहप्रवेश करतात हि आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना लाभार्थी कुटुंबांनी व्यक्त केली.
यावेळी स्वागत लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी महाले ,विस्ताराधिकारी दिग्विजय जाधव, ग्रामसेविका कविता बाबर ,या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेले ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ,अविनाश बनगे ,उपसरपंच सौ रोशन कांबळे ,ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील ,अजिंक्य कोळी ,प्रकाश यादव ,सुरज कांबळे ,सौ मनीषा मोघे ,सौ स्वाती दानोळे ,सौ कल्याणी कोळी , तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय पाटील,पोलिस पाटील सौ. फरास ,आप्पासो पाटील ,विनोद कोळी ,निशिकांत पाटील, दिनकर कांबळे ,शिवाजी कांबळे ,बाळासो कांबळे ,गौतम कांबळे अब्दुल सुतार ,नामदेव कांबळे , अनमोल कदम,आशा स्वयंसेविका ,विविध संस्थांचे पदाधिकारी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.