माथेरान पॉईंट चकाचक : स्थानिक दुकान धारकांनी राबवली स्वच्छता मोहीम
माथेरान पॉईंट चकाचक : स्थानिक दुकान धारकांनी राबवली स्वच्छता मोहीम
सत्याचा शिलेदार वार्तापत्र प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड माथेरान
महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे पर्यटकांना देखावे पाहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातील ३८ पॉईंट वेगवेगळे सुंदर देखावे पाहण्यासाठी पर्यटकांची दाट गर्दी पहावयास मिळत असून येथील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे काम माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून केले जात असले तरी पर्यटक मात्र पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्लास्टिक पिशव्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व इतर अनावश्यक वस्तू माथेरानच्या गर्द झाडीतील जंगलात फेकून देत माथेरानच्या निसर्गातील झाडे झुडपांना नुकसान पोहोचवत असताना दिसत असल्याने माथेरान येथील प्रत्येक पॉईंटवर अल्पोपहार नाश्त्याचे व मनोरंजनाच्या खेळांचे स्टॉल स्थानिक नागरिकांचे असून या व्यवसायाद्वारे आपली उपजीविका चालवीत असणारे स्टॉल धारक आपल्या आजूबाजूच्या परिसर मात्र स्वतःच स्वच्छ ठेवीत असतात. दिनांक ११/६/२०२४ रोजी निसर्ग पॉइंट स्टॉल होल्डर वेल्फेअर असोसिएनचे स्टॉल धारक यांनी आपले पर्यावरण स्वच्छ अभियान राभिवले
असून जंगलातील प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या काचेच्या बाटल्या व केरकचरा स्वच्छ करीत पॉईंटच्या आजूबाजूचा परिसर चकाचक करण्याचे मोलाचे कार्य करणारे संजय शिंदे .धोंडू कदम. जगदीश कदम. रमेश कदम .दत्तू शिंदे. सुनील सकपाळ .स्मिता कदम. गणेश .आधी स्टार धारकांनी केले असून आपल्या स्वच्छतेच्या कार्याबद्दल स्टॉल धारक समाधानकारक दिसत आहेत