माथेरान हातरिक्षा प्रवास सुविधेची जागा घेतली पर्यावरण पूरक ई रिक्षाने
माथेरान हातरिक्षा प्रवास सुविधेची जागा घेतली पर्यावरण पूरक ई रिक्षाने
सत्याचा केलेला वार्तापत्र प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड माथेरान
महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यातील ब्रिटिश कालीन जागतिक दर्जा प्राप्त निसर्गाच्या सानिध्यातील माथेरान. आणि या ठिकाणी जगभरातून वर्षा अखेर लाखो पर्यटक सहलीचा आनंद घेण्यासाठी माथेरानला येत असतात. या ठिकाणी पर्यटकांना निसर्ग देखावे पाहण्यासाठी माथेरानचे आकर्षण असणारे घोडेस्वारी व प्रामुख्याने हात रिक्षाची सुविधा पर्यटकांच्या पसंतीची ठरलेली आहे. माथेरान दस्तुरी ते मध्यबाजारपेठ हे ३ किलोमीटरचे अंतर चालत किंवा घोडेस्वारी मिनीट्रेन शटलसेवा व माणसाने माणसाला ओढनारी हाचरिक्षा या सुविधा प्रामुख्याने माथेरान मध्ये अनेक वर्षापासून सुरू आहेत आणि माणसाने माणसाला उडणारी अमानुष प्रथा रोखून या ठिकाणी पर्यावरणपूरक ई रिक्षा सुविधा माथेरान मध्ये असावी याकरिता २०१२ साली तात्कालीन माथेरान नगर परिषद मुख्याधिकारी नगरसेवक व नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या सहमताने ई रिक्षा सुरू करण्यासाठी ठराव करण्यात आला .आणि हातरिक्षा संघटनेला स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य करीत माझी नगराध्यक्ष सौ प्रेरणा सावंत तसेच मुख्याधिकारी सुरेखा भनगे यांनी अतिशय संघर्ष करीत माथेरान येथे पायलेट प्रोजेक्ट तत्त्वावर इ रिक्षा सुरू झाली . माथेरानचे आकर्षण व मूळ व्यवसाय असणारी माथेरान स्थानिक अश्वपाल संघटना व स्थानिक हातरिक्षा संघटना यांच्यातील संघर्ष वाढत जाऊन न्यायालयाचा दरवाजा गाठावा लागला . व न्यायालयीन आदेशाच्या नुसार स्थानिक हात रिक्षा चालकांना न्याय मिळत एकूण ९४ रिक्षा माथेरान मध्ये असाव्यात यासाठी मान्यता मिळाली याकरिता हात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी प्रकाश सुतार सुनील शिंदे शकील पटेल व स्थानिक नागरिकांसह नितीन शहा यांचे तन मन व धन मिळून मोलाचे सहकार्य हात रिक्षा संघटनेला करण्यात आले. दिनांक १० जून २०२४ माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी २० ई रिक्षा सुरू करण्यासाठी हिरवा झेंडा फडकवला याप्रसंगी माथेरान शहरातील राजकीय पक्ष अधिकारी तथा शासकीय क्षेत्रातील अधिकारी सामाजिक क्षेत्रातील नागरिकांसह संपूर्ण गावकऱ्यांनी स्थानिक ई रिक्षा चालकांनी चालविलेल्या रिक्षांचे सुवर्णक्षण डोळ्यात साठवून ठेवीत आनंद व्यक्त केला. एकीकडे माथेरानचे आकर्षण असणारे घोडे व घोडेश्वरी महत्त्वाचे असून सत्याचा शिलेदार वार्तापत्र चे पत्रकार चंद्रकांत काळे यांनी स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्ष आशाताई कदम यांच्यासह हितगुज साधले असता आशाताई कदम सांगतात की माथेरान शहरातील दळणवळण विकास कामासाठी आमचा विरोध नसून आम्हा स्थानिक अश्वचालकांची उपजीविका घोडे स्वारी व्यवसायावर असून आमचे जीवन भकास करू नका सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात खटला सुरू असून आम्हाला न्यायालय निर्णयाचा आदेश मान्य असेल असे वक्तव्य केले असून न्यायालयीन आदेशाचे आम्ही निश्चित पालन करू