माथेरान येथे एस .टी .पी. ठेकेदारांच्या काम अयोग्य : अश्वचालक राकेश कोकळे
अश्वचालक राकेश कोकळे यांनी एस .टी .पी. ठेकेदारांच्या अयोग्य काम आणून दिले निदर्शनास
सत्याचा शिलेदार वार्तापत्र प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड माथेरान .
निसर्गाच्या सानिध्यातील पर्यटक स्थळ निसर्गरम्य माथेरान येथे सध्या एस. टी .पी .चे काम जोमात सुरू असून करोड रुपयाचे ठेकेदारी पद्धतीने काम करीत असणारे ठेकेदार यांच्या कामाविषयी माथेरान कर विशेषता समाधानकारक नसले तरी अश्वचालक राकेश कोकळे यांनी एस .टी .पी .कामात झालेल्या चुका व एस .टी ,पी. लाईन चे चेंबर्स त्यावरील झाकणे योग्य नसल्याचे राकेश कोकळे यांनी आपले म्हणणे मांडीत असताना सुचविले की आम्ही अश्वचालक आमचे अश्व हे पर्यटकांसाठी माथेरान येथील साईट सीन दाखवण्यासाठी रस्त्यावरून येणे जाण्याच्या वेळेत चुकून घोड्याचे या चेंबर्समध्ये पडले तर घोडे जायबंदी होऊ शकतात .तसेच स्थानिक नागरिक व पर्यटक यांचेही अपघात होऊ शकतात ही बाब एस .टी .पी. इंजिनियर ठेकेदार यांच्या निदर्शनात आणून दिली असता त्वरित एस .टी .पी. ठेकेदार यांनी आपल्या कामगारांना आदेश देत नादुरुस्त योग्य काम न झालेले चेंबर्सची झाकणे त्वरित बदलली आहेत ही सूचना राकेश पोकळे यांनी केले असता ही कामे पूर्ण झाल्याने घोडे. हातरिक्षाचालक. माथेरानचे नागरिक. व पर्यटक. यांना होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी मोलाचे कार्य केल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे अशा पद्धतीचे चुकीची कामे न होता योग्य पद्धतीने कामे सुरळीत चालावीत असे अश्वचालक राकेश कोकळे यांनी सुचवले आहे….