अंबप परिसर प्रिमियर लिग अदित्य स्पोर्टस कासारवाडी विजेता
अंबप परिसर प्रिमियर लिग अदित्य स्पोर्टस कासारवाडी विजेता
नवे पारगाव, ता.१३: अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूप्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजित अंबप परिसर प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद अदित्य स्पोर्टस कासारवाडी संघाने पटकाविले. अंबपवाडीच्या एस. एन. स्पोर्टर्सला उपविजेतेपद मिळाले. विजेत्या व उपविजेत्या स़घास अनुक्रमे ३२ हजार, २२ हजार रुपये व चषक देण्यात आले.
मॅन ऑफ दि सेरीजचा बहुमान आशितोष अंबपकर, अंतिम सामना मॅन ऑफ दि मॅच पप्पू मोरे ( दोघेही अदित्य-कासारवाडी) या खेळाडूना मिळाला.
सिध्दार्थ दाभाडे वाॅरियर्स अंबप, जाधव वाॅरियर्स अंबपवाडी, आदित्य स्पोर्टस कासारवाडी, प्रशांत निचळ वाॅरियर्स अंबप,एस. एन. स्पोर्टस अंबपवाडी, जुगाई वॉरियर्स मनपाडळे या संघा दरम्यान एपीपीएल-२०२४ क्रिकेट स्पर्धा सात दिवस स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत अदित्य स्पोर्टस कासारवाडी, एस. एन. स्पोर्टर्स अंबपवाडी, सिध्दार्थ दाभाडे वाॅरियर्स अंबप, प्रशांत निचळ वाॅरियर्स अंबप हे चार संघ उपांत्य फेरीत तर अंतिम सामना अदित्य स्पोर्टस कासारवाडी, एस. एन. स्पोर्टर्स अंबपवाडी यांच्यात झाला.
विजेत्या, उपविजेत्या संघास अनुक्रमे ३२ हजार रुपये, २२ हजार रुपये व चषक
माजी जिल्हा परीषद सदस्य, दलितमित्र अशोकराव माने, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने, हर्षवर्धन लोकरे यांच्या हस्ते झाला.प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ दि मॅच, सलग तीन विकेट, उत्कृट झेल, सलग तीन षटकार, सलग चार चौकार मारणाऱ्यां खेळाडूंना वैयक्तीक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी संघ मालक यांच्यासह संजय शिंदे, जयवंत कदम, वसंत माने, सचिन रजपूत, श्रीकांत अंबपकर, राजेंद्र मुळीक उपस्थित होते.तुषार कुंभार, ओंकार जाधव, अजित चिबडे, अभि शिंदे, मनोज हिरवे, शिवकांत अंबपकर, अक्षय लोकरे, श्रेयश नाईक, शुभम नाईक यांनी संयोजन केले. अविनाश दबडे, बालाजी माने यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. श्रीकांत जगताप यांनी सूत्रसंचालन केले. राज हराळे यांनी आभार मानले.
—-