ताज्या बातम्या

अजितदादांचा संपूर्ण परिवार शिरुरमध्ये ! जाणून घ्या कारण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकला आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघासह शिरुर लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होऊन दाखवण्यासाठी थेट चॅलेंज दिले होते. त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार फॅमिली कामाला लागली आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पार्थ पवार यांच्या भेटीगाठींनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके व माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सुनेत्रा पवार यांचे स्वागत करून कटके कुटुंब आणि मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

महिलांच्या आवडता व सन्मानांचा सण म्हणजे मकर संक्रात आणि या महिलाच्या सणा निमित्ताने राज्यभर हळदी कुंकवाचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू या कार्यक्रमाला मी हजेरी लावत असते. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यानंतर पार्थ पवार आणि आता सुनेत्रा पवार यांचे वाढते दौरे हे अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढवणारे आहेत.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळाले, पण लगेचच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं. यानंतरच्या काळामध्ये अमोल कोल्हे हे कधी अजित पवारांसोबत तर कधी शरद पवारांच्या सोबत दिसले. त्यामुळे कोल्हेंचा नेमका स्टँड काय आहे हे समजणे अवघड झाले होते. मात्र त्यानंतर अजित पवारांनी कोल्हेंना इशाराच देत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणून दाखवणार असल्याचा इशारा दिला.

इशारा दिल्यानंतर थेट अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या हडपसर विधान सभा मतदार संघामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहचले. त्यानंतर पार्थ पवार सातत्याने शिरूर मतदार संघातील हडपसर परिसरात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसले. याच दम्यान शनिवारी शिरूर मतदार संघातील वाघोली परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेवून मनमोकळेपणाने संवाद साधला.

▪️पार्थ पवार निवडणूक लढविणार ?

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळेच सुनेत्रा पवार या हळदी कुंकू कार्यक्रमांना हजेरी लावून महिलांशी संवाद तर साधत नाही ना अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button