कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा ;शहर प्रमुख रविकिरण इंगवले
भगवा सैलाब रॅलीचं आयोजन
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा, यासाठी आज ठाकरे गटाच्या वतीनं शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी भगवा सैलाब रॅलीचं आयोजन केलं होत. सकाळी 11 वाजता शहर कार्यालयाजवळ भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला आणि भगवे ध्वज घेवून आणि भगव्या टोप्या घातलेले हजारो शिवसैनिक एकत्र आले. या ठिकाणी रविकिरण इंगवले, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांच्या उपस्थितीत सैलाब रॅलीला प्रारंभ झाला. चित्ररथासह ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही रॅली खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी, शिवाजी चौक इथून ही रॅली भवानी मंडप इथं आली. यावेळी इंगवले यांनी निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेवून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा यासाठी घातल साकड. रॅलीत माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे, रिक्षा सेनेचे राजू जाधव, विशाल देवकुळे, दीपक गौड, दिनेश परमार, रावसाहेब इंगवले, रीमा देशपांडे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.