नवे पारगावात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
नवे पारगावात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
नवे पारगाव ता. हातकणंगले येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
दंत महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ. शिल्पाताई कोठावळे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले. विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. स्वागत व प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक विनायक माने यांनी केले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत सादर केले. प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी डॉ. शिल्पाताई कोठावळे, डॉ. रजनी कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध वरेकर, डॉ .प्रज्ञा खटावकर, डॉ. कौशल कोठावळे, डॉ माधुरी निकम, डॉ. प्रद्युग्न निट्टुरकर, डॉ. कामीला मुलाणी, शिवाजी पाटील यांची भाषणे झाली
याप्रसंगी डॉ. के के माने ,डॉ. सूर्यकांत मेटकरी, डॉ. सुधा पाटील -हंचनाळे, डॉ गौरव ,डॉ. भरत ,डॉ. केतकी कुलकर्णी ,डॉ. स्नेहल शेंडे ,कामगार सोसायटीचे उपाध्यक्ष सुधीर जाधव, अशोक पाटील , सचिव विद्याधर कांबळे, सर्व संचालक मंडळ,दंत महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, महात्मा गांधी हॉस्पिटल चे कर्मचारी , विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार विनायक माने यांनी मानले.