आदर्श गुरुकुल विद्यालयाची सलग १९ वर्ष दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा
आदर्श गुरुकुल विद्यालयाची सलग १९ वर्ष दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा
फोटो :-आदित्य शेटे
पेठ वडगाव ता.२७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (ता.२७) सोमवार रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये पेठ वडगांव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयाने शाळा स्थापनेपासून सलग १९ वर्ष दहावी परिक्षेत १०० टक्के निकाल परंपरा अबाधित ठेवली आहे.
एकूण १७९ विद्यार्थ्यांपैकी १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष श्रेणीत १२१ ,प्रथम श्रेणीत ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुढील प्रमाणे अनुक्रमे गुणवत्ता प्राप्त
-
आदित्य शेटे ९४.६० टक्के
-
आदित्य मोरे ९४ टक्के
-
अदिती पाटील ९३ .४० टक्के
-
शर्वरी काळे ९२ .८० टक्के
-
शार्दुल कोळी ९२.६० टक्के
-
तिर्थक पाटील ९१.८० टक्के
-
प्रचिती पाटील ९०.६० टक्के
-
तन्वी देसाई ९० टक्के
गुण प्राप्त केले विद्यार्थी तर ९० टक्के पेक्षा अधिक ८ विद्यार्थी, ८५ ते ९० टक्के मिळवले २५ विद्यार्थी, ८० ते ८५ टक्के मिळवले ४२ विद्यार्थी आहेत.
यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे संस्थेच्या सचिव एम. डी. घुगरे यांची प्रेरणा लाभली. तसेच पर्यवेक्षक एस.जी.जाधव, प्रशासक एस. ए. पाटील, एस.एस. चित्ते, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मा.आर.बी.शिवई, प्रशासक श्री.एम.एच.चौगुले सर आणि सौ.एस.एस.गिरीगोसावी ,वर्ग शिक्षक व्ही .आर .पाटील, एस .टी .खाडे , पी .एम .गायकवाड, एस. पी शिसोदे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.