गडमुडशिंगीत श्री.बिरदेव जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न
गडमुडशिंगी (करवीर) येथे बिरदेव जन्मोत्सव समयी उपस्थितीत समाज बांधव
गडमुडशिंगीत श्री.बिरदेव जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
गडमुडशिंगी (ता-करवीर)येतील ग्राम दैवत आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री. बिरदेव जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती मय वातावरनात पार पडला.
सायंकाळी नृसिंह गली येतील आण्णासो माळी यांच्या घरी जाऊन श्रींचा पाळना घेण्यात आला. अतिशय आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून पाळणा देवमाळी मार्गाने मंदिराकडे प्रस्तान झाला.या वेळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण रात्र भर धनगरी ढोल वाजनाच्या गजरात,बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या जय घोष्यात, भंडाऱ्याच्या मुक्त हस्त उधळीनीत मंदिरामध्ये पाळणा आणला. पहाटे देव पुजा करून सूर्योदय समयी “श्री”पाळण्यावर चांगभलं च्या गजरात पुष्प वृष्टी करण्यात आली. बिरदेव जन्मोत्सव कार्यक्रमात ग्रामस्थ ,भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होते. जन्मोत्सवा नंतर सुंठवडा वाटप करण्यात आले. धनगरी ओवी गायनामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय बनून गेला होता. सम्पूर्ण मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन समस्त धनगर समाज ,धूळ सिद्ध बिरदेव वालुग मंडळ,क्रांति वीर फ्रेन्ड सर्कल, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर युवक मंडळ यांनी केले होते.