या दिवसापासून महाराष्ट्र पाऊसाचे आगमन होणार
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी उमेश सुतार
25 मे ते 20 जून पर्यंत चा साधारण हवामान आढावा
26/27 मे राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र सातारा पुणे पुर्व भाग सोलापूर अहमदनगर नाशिक सह काही परिसरात ढगाळ हवामान होऊन वादळी पाऊस होईल हा पाऊस दक्षिण भागात अधिक राहील मध्य महाराष्ट्र विभागात आता उष्णतेची लाट काही प्रमाणाने कमी होईल
मध्य महाराष्ट्र सातारा पुणे कोल्हापूर सांगली अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजी नगर सह मराठवाडा विभागात काही भागात 1/2/3/4 जून मान्सून पुर्व जोरदार पाऊस होईल
6/7 जून ज्या जवळपास अरबी समुद्रात एक सिस्टम निर्माण होऊन कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस जून च्या दुसऱ्या आठवड्या देईल तसेच 14/15 ते 18 जून या काळात देखिल एक सिस्टम अरबी समुद्रात निर्माण होईल याचा परिणाम देखिल राज्यात चांगला होईल याच काळात मान्सून चे आगमन होणार आहे
उत्तर महाराष्ट्र 25 मे
उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव तीव्र उष्णतेची लाट पुढील पाच दिवस कायम राहील नाशिक संभाजी नगर अहमदनगर काही भागात पुढील दोन तीन दिवस गडगडाटी पाऊस अधून मधून होईल 1/2/3/4 जून मान्सून पुर्व पाऊस सरू होईल 6/7/8 जून नंत्तर देखिल पाऊस सक्रिय होईल
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होईल
मध्य महाराष्ट्र 25 मे पुढील दोन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होईल दिवसाचे तापमान आता घट होईल 1/2/3 जून जोरदार वादळी पाऊस मान्सून पुर्व पाऊस होईल 6 /7/8 जून नंत्तर देखिल पाऊस सक्रिय होईल
मराठवाडा 25 मे मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली बीड धराशिव जालना बीड परभणी या भागात स्थानिक वळिव पाऊस आठवड्याच्या शेवटी सरू होईल काही भागात एक आठवडा तीव्र उष्णतेची लाट राहील
विदर्भ 25 मे
विदर्भ पुढील एक आठवडा नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशीम बुलढाना अकोला तीव्र तापमान वाढ कायम राहील स्थानिक तापमान वाढी मुळे तूरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो