महात्मा गांधी विद्यालयाचा बारावी परीक्षेत विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा शंभर टक्के निकाल
महात्मा गांधी विद्यालयाचा बारावी परीक्षेत विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा शंभर टक्के निकाल
विज्ञान शाखेची कु.समृद्धी शिंदे महात्मा गांधी विद्यालयात प्रथम
रुकडी ता. २२: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल (ता.२१)मंगळवारी जाहीर झाला.यामध्ये महात्मा गांधी विद्यालय रूकडी चा विज्ञान व व्यवसाय अभ्यास शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे.तर कला व वाणिज्य शाखेचा ९७.१२ टक्के निकाल लागलेला आहे. विज्ञान शाखा त ९० विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी उत्तीर्ण ९० झाले असून ,संयुक्त (कला व वाणिज्य) शाखेत ७२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी उत्तीर्ण ७० उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये २७ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखा
- प्रथम क्रमांक :- समृद्धी शिंदे ८९.८३ टक्के,
- द्वितीय क्रमांक:- भाग्यश्री जाधव ८९ टक्के
- तृतीय क्रमांक:-तेजस फडके ८७.८३ टक्के
कला व वाणिज्य शाखा
- प्रथम क्रमांक :- संमती शेटे ८४.६७ टक्के
- द्वितीय क्रमांक:- सानिका पाटील ८४.५०टक्के
- तृतीय क्रमांक:- आरती कांबळे ७९.६७ टक्के
विज्ञान विभागाकडील एग्रीकल्चर विषयात तेरा विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत.
यासाठी प्राचार्य एम.एस.हजारे, पर्यवेक्षक एम. एम सूर्यवंशी, ज्युनिअर विभाग प्रमुख आर.एन. परीट, तसेच सर्व शिक्षक यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले.