माणगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय सामाजिक सलोखासाठी ठरली आचारसंहिता
सामाजिक सलोखासाठी माणगाव ग्रामपंचायतीने ठरवली आचारसंहिता
सर्वधर्मीय शांतता समितीची स्थापना
रूकडी ता.२२: माणगाव (ता.हातकणगंले) येथील ग्रामपंचायतीने सामाजिक सलोखा टिकावा यासाठी आचारसंहिता बनविली आहे.तसेच सर्वधर्मीय शांतता कमिटी स्थापन करण्यात आली आहे. (ता.१७) ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत ग्राामसभेत अनिल जगदाळे, नंदकुमार शिंगे यांनी हा ठराव मांडला त्यास अनिल पाटील, दादासो वडर यांनी अनुमोदन दिले.(ता.२२ मे रोजी) सर्व प्रोसिडिंग पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेचे ठरावाचे प्रत जिल्हाधिकारी,उपविभागीय कार्यालय इचलकरंजी,तहसिलदार ऑफिस व पोलिस स्टेशन हातकणंगले यांना देण्यात आले आहे.(ता.१२ मे) रोजी मोबाइलवरील स्टेटसवरुन दोन समाजात थेट निर्माण झाले होते. याची दखल घेऊन सामाजिक सलोखा टिकावे याकरिता माणगाव ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवून आचारसंहिता तयार केली.
आचारसंहिता पुढील प्रमाणे असेल
● गावामध्ये डॉल्बी,चौकात डिजिटल फलक लावणे ,सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस निमित्त फटाके वाजविणे यावर बंदी घातली आहे.
● दुचाकी वाहनांचे पुंगळ्या काढून गावभर मोठ्या आवाजात फेरफटका मारत असतात. चौकात,गल्लीत वाहन थांबवून मोठा आवाज काढत असल्याने नागरिकांना त्रास बरोबर वादावादीचे प्रसंग घडत असल्याने या प्रकारावर बंदी घालण्यात आली आहे.
● गावामध्ये धार्मिक-सामाजिक-राजकीय कार्यक्रम सह वाढदिवसानिमित्त डिजीटल फलक न लावणे.
● सार्वजनिक रस्त्यावर खडूने अथवा चॉकपिटने नवीन वर्षाच्या स्वागताचे शुभेच्छा संदेश, गावातील मार्गावर वाढदिवस साजरा करणे. वाढदिवासा निमित्त चौकात रात्रो ,अपरात्री फटाके वाजविणे,रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर खेळ खेळण्यास ही प्रतिबंध करण्यात आले आहे.
● जातीय तणाव होईल असे स्टेटस लावणे .असे मजकूर सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येईल.
या नियमावलीचे पालन सर्वांना बंधनकारक राहणार असून त्याचे उल्लघंन केल्यास संबंधितांचे नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद व घरफाळामध्ये पाच हजार रुपयांचा दंड आकारुन वसूल करण्याचा ठराव ग्राम सभेने संमत केला आहे.
गावांमध्ये स्टेटस वरून निर्माण झालेला जातीय तेढ गावास अशोभनीय होता.सामाजिक शांतता व सलोखा टिकावे याकरिता ग्रामसभेत ठरवलेल्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
डाॅ.राजू मगदूम , सरपंच माणगाव