ऐश्वर्या शासम फाउंडेशन कडून जागतिक मदर्स डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
ऐश्वर्या शासम फाउंडेशन कडून जागतिक मदर्स डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
दि.8/5/2024 रोजी जागतिक मदर्स डे निमित्त दौंड तालुक्यातील महिलांसाठी त्यांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी दौंड मध्ये हॉटेल प्राईम स्क्वेअर या ठिकाणी ऐश्वर्या शासम फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले. त्यामध्ये ब्लड चेकअप, हिमोग्राम, ब्लड शुगर, बॉडी मास इंडेक्स बी एम आय, कराडा स्कॅन, फॅट, मसल, बॉडी एज, बी एम आर, वजन इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
त्यामध्ये शंभरहून अधिक महिलांनी सहभाग घेऊन चेकअप केले. त्यामध्ये चेकअप केलेल्या महिलांना त्यांच्या लाइफस्टाइल संबंधी माहिती देण्यात आली. त्यामध्ये डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी सर यांनी अनेमिया का होतो याविषयी मार्गदर्शन केले व डॉ. क्षितिजा कुलकर्णी मॅडम यांनी अनेमिया वरती मात कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. देव पॅट्रीक वेलनेस अँड फिटनेस एक्सपर्ट व त्यांचे सहकारी यांनी तंदुरुस्त कसे राहायचे याविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यांचा फायदा नक्कीच होईल.
ऐश्वर्या शासम फाउंडेशनच्या सर्व टीम सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन सुव्यवस्थितपणे केले. ऐश्वर्या शासम फाउंडेशनने मुकुल माधव फाउंडेशन, योगेश्वरी हेल्थ फाउंडेशन, योगेश्वरी लेबोरेटरी स्टाफ, क्लब वन केम पुणे,Olon api India pvt Ltd महाड, दौंड कॉलेजचा रोटरॅक्ट क्लब, श्रीराम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर, औदुंबर हाके सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून शिबिर संपन्न करण्यात आले.