तालुका हातकणंगले वार्ता
गांधीनगर पोलिसांच्या प्रयत्नामुळे मेन रोडवरील वाहतूक सुरळीत
गांधीनगर मेन रोडवर वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचारी
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
गांधीनगर मेनरोडवर रविवारी झालेली वाहतुकीची कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत झाली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून दीपावलीच्या खरेदीसाठी गांधीनगर मेन रोडवर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला वाहनधारकांसह ग्राहक व्यापारी वर्गासह ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. रविवारी मेन रोडवर झालेली वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शहाजी पाटील व रोहित ठोंबरे यांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पोलीस कर्मचारी शहाजी पाटील व रोहित ठोंबरे यांनी वाहतूक सुरळीत केल्यानंतर व्यापारी वर्गाने या जोडीला जय-वीरू असे संबोधत कृतज्ञता व्यक्त केली.