ताज्या बातम्या
कोल्हापुरातील मेगा कायदेविषयक सेवा शिबिराचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे
कोल्हापूर, राज्य विधीसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे भव्य मेगा कायदेविषयक सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये कायदेविषयक माहिती तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.