ताज्या बातम्याशेत-शिवार

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, माणगाव येथे शेतकरी आक्रमक 

शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे बाबतचा निवेदन देताना कृती समितीचे शिवगोंडा पाटील,राजू मुगुळखोड,सुनिल बन्ने, निळकंठ मुगुळखोड,राजगोंडा बेले, महावीर पासगोंडा, शामराव कांबळे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, माणगाव येथेशेतकरी आक्रमक 

 

रूकडी माणगाव : प्रस्तावित पत्रादेवी महामार्ग रद्द करण्यात यावा व तसा विशेष  सभा बोलवून याबाबत ठराव करण्यात यावा या आशयाचे  निवेदन  माणगाव ता.हातकगणंगले येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकर्यांनी माणगाव ग्रामपंचायतीकडे दिला.निवेदन  उपसरपंच विद्या जोग यांनी स्विकारले.याप्रसंगी माजी उपसरपंच अख्तर भालदार,सदस्य नितीन कांबळे,मनोज आदाण्णा उपस्थित होते.

नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ  महामार्ग विरोधात माणगाव ता.हातकणगंले येथील शेतकरी आक्रमक  झाले आहेत.महामार्ग बाधित शेतकर्यांचे बैठक येथील शारदा दूध संस्थेत झाले.याप्रसंगी शिवगोंडा पाटील यांनी ,माणगाव येथील  96  एकर जमिन बाधित होणार असून  यातील 4 एकर जमिन खराब आहे.उर्वरित 92 एकर जमिन ही बागायत  व दर्जेदार जमिन आहे. ही जमिन शासन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असून यामुळे गावातील 450 शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे सांगितले.

राजू मुगुळखोड यांनी  ,ऺशासनाने  महामार्गाचा पुर्नविचार करावा.  महामार्ग लगत वीस,पंचवीस पूटाचा भराव पडणार असल्याने गावातील जमिन शिल्लक राहणार नसून  शेतकरी भूमिहीन होण्याचा मार्गावर असल्याचे सांगितले .

निवेदन मध्ये ,माणगाव येथे शक्तिपीठ महामार्ग झाल्यास गावास पूराची भीती असून पूर वेशीलगत येण्याची शक्यता आहे.यामुळे हजारो एकर जमिन नापीक होणार आहे. उसासा दर मिळाल्यापासून शेतकरीचे आर्थिक संपन्नता वाढले असल्याने यातून शेतकरी स्वखर्चाने व कर्ज घेवून सिंचनाची व्यवस्था केले आहेत.यामुळे गाव पूर्णपणे बागायत क्षेत्र झाले आहे. प्रस्तावित महामार्गामुळे यावर घाला येणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे निवेदन मध्ये नमूद आहे.

निवेदन प्रसंगी राजगोंडा बेले,युवराज शेटे, निळकंठ मुगुळखोड,राजू मुगुळखोड,सागर महाजन,अभय व्हनवाडे,सुभाष पाटील, महावीर पासगोंडा,शामराव कांबळे, अभिषेक मगदूम, प्रविण  पाटील,महावीर देमाण्णा,सुनिल बन्ने,सह मोठ्या प्रमाणात  शेतकरी उपस्थित होते.

 

 

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दि.18 रोजी आयोजित केलेल्या शेतकरी निर्धार मेळावा व मोर्चास माणगाव  येथून मोठ्या संख्येने  शेतकरी उपस्थित राहण्याचा निर्धार केले.बैठकीस मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button