ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये लागेल ते सहकार्य करू :पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागल: कागलमध्ये नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्रताप उर्फ भैया माने, डॉ. प्रवीण चौगुले व प्रमुख मान्यवर.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये लागेल ते सहकार्य करू :पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

 

कागलमध्ये दहावी बारावीतील गुणवंतांचा सत्कार   

नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन

पत्रकार- सुभाष भोसले

दहावी बारावीसह सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.कागलमध्ये नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जीवनात शिक्षणाला पर्यायच नाही शिक्षणामुळेच प्रगती होते. तुम्ही तुमच्या आवडीने आणि पालकाच्या संमतीने कुठेही प्रवेश घ्या. तिथे तुम्हाला सहज प्रवेश मिळण्यासाठी मी लागेल ते सहकार्य करेन.

          मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच फाउंडेशनच्या माध्यमातून सतत शैक्षणिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते. फाउंडेशनच्या माध्यमातून कागलमध्ये एमपीएससी यूपीएससी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली परंतु विद्यार्थ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा राजस्थानमधील कोटा आणि पुण्यातील मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच कागलमध्येही एमपीएससी व यूपीएससी मार्गदर्शन सुरू करू. त्यासाठी आवश्यक सर्व सेवा-सुविधा पुरवू आणि मनुष्यबळाचाही लागेल तो खर्च फाउंडेशनच्या माध्यमातून करू. या माध्यमातून सीईटी, नीट आणि जेईईच्या प्रशिक्षणार्थीनाही सोय उपलब्ध होईल.

यूपीएससी व एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देणार मानधन……!मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, यूपीएससी व एमपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अंतिम परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये व अतिगरीब विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये याप्रमाणे फाउंडेशनच्या वतीने मानधन सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी डी. आर. माने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रवीण चौगुले यांनी दहावी- बारावीनंतरच्या पुढील वाटा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि पालकाची भूमिका, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

                 केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन समाजहिताचे आणि विशेषता शैक्षणिक उपक्रम राबविण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. दहावी- बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जीवनाचा एक नवीन टप्पा सुरू होतो. या भावी जीवनाला ताकद देण्यासाठी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

            व्यासपीठावर ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष नवल बोते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, प्रवीण काळबर, दत्ता पाटील- केनवडेकर, प्रकाश नाळे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, सतीश घाडगे, पंकज खलीफ, शंकर संकपाळ, सागर गुरव, बच्चन कांबळे, संग्राम लाड आदी प्रमुख उपस्थित होते.

           स्वागत नगरसेवक प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार शशिकांत नाईक यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button