ताज्या बातम्या

ट्रॉली शो व रोडशो च्या माध्यमातून होणारा परप्रांतीय मुलींचा नंगानाच थांबवा : युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )

कोल्हापुरातील ग्रामीण परिसरात उरूस व यात्रेनिमित्त ट्रॉली शो व रोडशो च्या माध्यमातून होणारा परप्रांतीय मुलींचा नंगानाच थांबवा — युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )

 

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा, यात्र, उरूस, इत्यादी मध्ये नृत्याच्या नावाखाली ट्रॉली शो ,रोड शो , झालेत आणि होत आहेत. तसेच तोगड्या कपड्यांमध्ये ग्रुप डान्स चा नावाखाली फक्त मुली नाचवल्या जातात. त्या मुली नृत्याच्या नावाखाली निव्वळ नंगानाच करतात, ही जणु अलीकडच्या हुल्लडबाजांनी प्रथा पाडली आहे,वाढते बलात्कार, महिला अत्याचार ही भीती -चिंता सर्वत्र होत असतानाच या नंगानाच प्रकारांना या शोज मुळे पाठबळ मिळत आहे,

या मध्ये संबंधित मुली ट्रॉलीवर उभे राहून गल्लो – गल्ली चौका -चौकात सर्वांकडे पाहून अश्लील हावभाव करत असतात..आणि याच्यावर मध्यधुंद होऊन तरुणाई नाचत असते, या कृत्यातून छत्रपती शाहूंच्या या नगरीने काय वारसा घ्यायचा?

अशा शोज मुळे प्रामाणिक नृत्य करणारे नृत्य कलाकार वंचित राहत असून आज बेरोजगार आहेत. पण त्यांनी कलेशी प्रामाणिक राहून कुठलाही असा प्रकार करत नाहीत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ही दुर्दैवाची बाब आहे. याउलट नग्न अवस्थेत नाचणाऱ्या मुलींची मागणी वाढली आहे.जणु या प्रकार बघून ओपन बार चे वातावरण या शोज मुळे निर्माण होत आहे.या किळसवाण्या नंगानाच प्रकाराचे युवासेने कडे काही व्हिडीओ प्राप्त आहेत.सदर प्रकरणात संपूर्ण युवापिढी बरबाद होत चालली आहे, त्यामुळे आमची पोलीस प्रशासनास विनंती आहे.कि अश्या उरुसातील – जत्रेतील शोज च्या वेळी, ज्या त्या स्थानिकमंडळे, किंवा आयोजिक यांना अश्या नंगानाच करणाऱ्या मुली आणणेवर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत.येणाऱ्या काळात गणेश उत्सव व लोकोत्सवांमध्ये असे प्रकार घडून येत याची दक्षता घेणे आपलं कर्तव्य आहे याची जाण राखत आम्ही या प्रकरणावरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा करत आहे.अशा मागणीचे निवेदन  युवा सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे )माध्यमातून आज पोलीस निरीक्षण तानाजी सावंत यांना देण्यात आले.

यावेळी युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडलीयावर तानाजी सावंत यांनीआम्ही अशा नंगा डान्स करणाऱ्या मुलींवर कारवाई करू असे आश्वासन दिले..

यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने,जिल्हा चिटणीस अमित बाबर,शहर समन्व्यक रघु भावे, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, चिटणीस अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे,उपशहर प्रमुख कीर्ती जाधव, रोहित वेढे, अनिकेत ठोंबरे, लतीफ शेख,अभि दाबडे,तालुका प्रमुख राकेश चौगुले,युवतीसेनेच्या सानिका दामूगडे, प्रिया माने, सिद्धी दामूगडे, उपतालुका प्रमुख आकाश लोंढे, आदित्य जाधव, आकाश शिंदे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button